100 + Sunder Vichar status | मराठी सुविचार | Good Thoughts in Marathi On Life

100 + Sunder Vichar status | मराठी सुविचार 

 Good Thoughts in Marathi On Life  


ध्येयाला आकार दिल्यावर
स्वप्न पण साकार होतात...
प्रयत्नांचे पंख लावल्यावर
भरारी घेण्याचे चमत्कार
पण होतात.

🌹 💙💚💛💜🌹 

संकटाच्या वेळी काही सुचत नसते
पण आई-बाबा आणि देव यांचे नाव
नक्कीच सुचत असते.
🌹 💙💚💛💜🌹


sunder-vichar-status-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life-vb-good-thoughts-vijay-bhagat
sunder-vichar-status-मराठी-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life
 
आयुष्यात काही पराभव हे
विजयाहून अधिक श्रेष्ठ असतात.
 🌹 💙💚💛💜🌹

आयुष्यात आलेली वाईट वेळ
निघून जाते. परंतु जातांना
चांगल्या चांगल्या लोकांचे
खरे रूप दाखवून जाते.
🌹 💙💚💛💜🌹

बोलणारा तर सहजच बोलून जातो
पण त्याला कुठे ठाऊक असते की
ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द
कोरला जातो.
🌹 💙💚💛💜🌹
 
आपला आहार हा आपल्या
चवीवर अवलंबून असतो.
परंतु आपले आरोग्य हे
जीवनसत्वावर अवलंबून असते.
चव हा आवडीचा प्रश्न आहे.
परंतु आरोग्य हा गरजेचा प्रश्न आहे.
आवडी पेक्षा गरज महत्त्वाची
वाटायला लागली की जीवन
आपोआपच सुंदर.... निरोगी....
आणि समाधानकारक....
बनेल यात शंका नाही....!
🌹 💙💚💛💜🌹
  
प्रत्येक गोष्ट कधीकधी आपल्या
मनासारखी घडत नाही.
म्हणून दु:खी राहण्यापेक्षा
खंबीर राहायचे कारण
धोका आणि संधी मिळाल्यावर
माणूस अनुभवातून यशस्वी होतो.
🌹 💙💚💛💜🌹
 
साहसी माणूस भीत नाही....!
आणि भिणारा माणूस साहस
करत नाही....! जगात साहस
केल्याशिवाय कुणालाच यश
मिळत नाही. कारण ज्याच्या
कर्तुत्वात हिम्मत त्यालाच किंमत.
 🌹 💙💚💛💜🌹

एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक व्यक्तिमत्व म्हणून जगा.
कारण व्यक्ती कधी ना कधी संपते
परंतु व्यक्तिमत्त्व मात्र नेहमी जिवंत राहते...
 🌹 💙💚💛💜🌹

राग हा वाईट असला तरी
योग्य वेळी न आल्यास
मनात वादळाचे चक्रीवादळ
निर्माण होते.
 🌹 💙💚💛💜🌹

मातीने घडवलेल्या भांड्याचे.....
आणि काटकसर करून घडवलेल्या
कुटुंबाचे मूल्य त्यालाच कळते.....
ज्याने आपल्या जीवनाची सर्कस
करून ते घडवलेले असते.
🌹 💙💚💛💜🌹

marathi suvichar | sunder vichar | status suvichar | Marathi Quotes 

जर देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल
पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा.
कारण शिव्या अथवा ओव्या.... शाप अथवा आशीर्वाद....  
निंदा अथवा स्तुती..... सुख अथवा दु:ख.... यापैकी
आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत
आपल्याकडेच येणार..... हा चैतन्य शक्तीच्या
स्वभावधर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे.
आणि या नियमाला स्वतः भगवंत सुद्धा चुकलेले
नाहीत.... मग आपण तर सामान्य जीवजंतू.
 🌹 💙💚💛💜🌹

खरेपणाची कबुली द्यायला पण काळजात
देवत्व असावे लागते. कारण सत्य हे शिव
एवढेचं सुंदर आहे. जिथे जीव तिथे शिव
 🌹 💙💚💛💜🌹

सुंदरता फक्त चेहऱ्याला नसते
तर स्वभावाला सुद्धा असते.
 🌹 💙💚💛💜🌹

प्रामाणिकपणा आणि कष्ट
कधीच वाया जात नाही.
त्याचे फळ उशिरा का होईना
पण नक्कीच मिळते.
 🌹 💙💚💛💜🌹

नेहमी आपल्याला असे वाटते की
आपल्यापेक्षा दुसऱ्याचे जीवन जास्त
चांगले आहे. परंतु आपण हे विसरून
जातो की दुसऱ्यांसाठी आपण ही
दुसरेच असतो.
🌹 💙💚💛💜🌹
 
जर खऱ्या अर्थाने
सामर्थ्यवान बनायचे
असेल तर एकट्यानेच
लढायला शिका.
🌹 💙💚💛💜🌹
 
काही माणसे श्रीमंतीला
नमस्कार करतात...
काही माणसे गरिबाला
गुलाम करतात... मात्र
जी माणसे माणुसकीला प्रणाम
करतात तीच माणसे खऱ्या
आयुष्याचा सन्मान करतात.
🌹 💙💚💛💜🌹

marathi suvichar | sunder vichar | status suvichar | Marathi Quotes

 
जितकी मोठी स्वप्न
तितके मोठे संकट आणि
जितके मोठे संकट
तितके मोठे यश.
🌹 💙💚💛💜🌹


आदर करायला शिका.
ना जीवन परत येते....
ना जीवनातील माणसे....!
 🌹 💙💚💛💜🌹

जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी
आपले शरीर आहे....
जर ते चांगले असेल
तर आपण जगातील
कोणतीही प्रॉपर्टी
खरेदी करू शकतो...
 🌹 💙💚💛💜🌹

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा....
कारण गेलेली वेळ परत येत नाही
आणि येणारी वेळ कशी असेल
हे सांगताही येत नाही.
🌹 💙💚💛💜🌹
 
वेळ आयुष्यात
सर्व काही शिकवत असते
आणि जे वेळ शिकवते
ते दुसरे कुणीच शिकवत नसते.
 🌹 💙💚💛💜🌹

जीवनातील
सर्वात मोठा आनंद म्हणजे
जे तुम्हाला जमणार नाही
असे लोकांना वाटते,
ते साध्य करून दाखवणे.
 🌹 💙💚💛💜🌹

आयुष्यात नाती तशी
भरपूर असतात पण ती
जपणारी माणसे फार
कमीच असतात.
 
🌹 💙💚💛💜🌹

marathi suvichar | sunder vichar | status suvichar | Marathi Quotes 

दगडात एक कमतरता आहे,
तो कधीही वितळत नाही.
परंतु एक चांगलेपणा हा आहे की
तो कधीच बदलत नाही...
 
🌹 💙💚💛💜🌹

 
एकदा जर मन मारून
जगायची सवय झाली ना....
तर हळू हळू सगळ्या भावना
पण नाहीश्या होऊन जातात...

🌹 💙💚💛💜🌹
  
अहंकार आणि गैरसमजामुळे
माणूस महत्त्वाच्या गोष्टीपासून
दूर राहतो. कारण गैरसमज
सत्याला ऐकू देत नाही
अहंकार सत्याला पाहू देत नाही.

🌹 💙💚💛💜🌹


माणसाने स्वतःला नक्कीच
बदलावे. पण इतकेही बदलू नये की
आपल्याच माणसांना आपण
परके वाटायला लागणार....!
 
🌹 💙💚💛💜🌹
 
घड्याळाकडे केवळ बघू नका
जे घड्याळ करते ते करा.
नेहमी पुढे जात रहा.
 
🌹 💙💚💛💜🌹

ओळख ही मोठ्या लोकांशी नाही
तर कोणत्याही परिस्थितीत
साथ देणाऱ्या लोकांशी असावी.

🌹 💙💚💛💜🌹


  
कशाला हवेत ते मोठे घर आणि बंगले....
जरी घर छोटे असले तरी चालेल
पण केवळ माणसे समाधानी हवीत....
 
🌹 💙💚💛💜🌹

marathi suvichar | sunder vichar | status suvichar | Marathi Quotes

रागाला आवरत चला कारण
त्याचे अस्तित्व जरी क्षणभरासाठी
असले तरी तो जीवनभराचे नुकसान
करण्याची शक्ती ठेवून असतो....!

🌹 💙💚💛💜🌹

 
एका मिनिटांत तर
जीवन बदलू शकत नाही
परंतु एक मिनिट विचार
करून घेतलेला निर्णय
संपूर्ण जीवन बदलू शकतो.

🌹 💙💚💛💜🌹
 
दुःख गिळून आनंद व्यक्त करणे
म्हणजे आयुष्य.... कष्ट करून
फळ मिळवणे म्हणजे व्यवहार.....
स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे
म्हणजे सहानुभूती...... आणि
माणूसकी शिकून माणसासारखे
वागणे म्हणजेच अनुभूती.....!

 🌹 💙💚💛💜🌹

हसणे खूप सुंदर आहे...!
दुसऱ्याला हसवीणे
त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे..
पण दुस-यावर हसणे निंदनीय आहे.
स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...
मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.
जीवनात हसणे... रडणे.... अटळ आहे.
फक्त हेतू शुद्ध... निरपेक्ष.... आणि परोपकारी....
असला की सर्व काही सुंदरच सुंदर आहे....!

🌹 💙💚💛💜🌹
 
माणसाचा जन्म
हा प्रत्येक घराघरात होतो.
परंतु माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते.

 🌹 💙💚💛💜🌹

स्वभावाच्या गोडीने आणि
जिभेवरील माधुर्याने माणसे
जोडली जातात.

marathi suvichar | sunder vichar | status suvichar | Marathi Quotes

🌹 💙💚💛💜🌹
 
मी ही चुकू शकतो...
हे एकदा मान्य केले की
पुष्कळ से वाद आणि विवाद
कमी होतात.

 🌹 💙💚💛💜🌹

गर्व करून नाती तोडण्यापेक्षा
क्षमा मागून ती नाती जपा.
कारण वेळ आल्यावर पैसा नाही
तर माणसेच साथ देतात.

 🌹 💙💚💛💜🌹

जीवनाचे तीन मंत्र
१] आनंदात : कोणतेही वचन देवू नका.
२] क्रोधात : काहीच उत्तर देवू नका
३] दुःखात : कोणताही निर्णय घेऊ नका.

 🌹 💙💚💛💜🌹

एखाद्याची आठवण येणे
आणि आपण आठवण काढणे
यात खूप अंतर आहे.
आपण आठवण त्याचीच काढतो...
जे आपले आहेत आणि आठवण
त्यांनाच येते जे तुम्हाला आपले
समजतात.

🌹 💙💚💛💜🌹

आयुष्यात आपल्या मनातला
आक्रोश आणि राग हा सगळ्यांनाच
सांगायचा नसतो. कारण आपला वापर
करणारे याचीच वाट पाहत असतात....!

  🌹 💙💚💛💜🌹

आज मागे आहात....
उद्या नक्कीच पुढे असू.
शेवट आजच्या प्रयत्नावर
अवलंबून आहे म्हणून
केवळ प्रयत्न करत राहायचे....
अनुभव घेत राहायचे.....
एक दिवस सगळे आपल्या
मनासारखे घडणार आहे....!

🌹 💙💚💛💜🌹

Marathi Suvichar | Sunder Vichar Status
मराठी सुविचार संग्रह | राग हा वाईट असला तरी
Good Thoughts In Marathi On Life
जसे बोलण्यापेक्षा
शांत रहायला
अधिक महत्व असते.
तसेच सांगण्यापेक्षा
ऐकून घेण्यालाही
अधिक महत्व असते.

🌹 💙💚💛💜🌹

यशस्वी माणसे
जग आपल्या निर्णयाने बदलतात.
आणि अयशस्वी माणसे आपले निर्णय
जगाला घाबरून बदलतात.
 
🌹 💙💚💛💜🌹

प्रमाणापेक्षा अधिक सुख...
आणि प्रमाणापेक्षा अधिक दु:ख
कधीच कोणाजवळ व्यक्त करु नका,
कारण लोकं सुखांना नजर लावतात.
आणि दु:खावर मीठ घासतात.

 🌹 💙💚💛💜🌹


मोत्यांना तर सवयच असते
विखुरण्याची..... पण
धाग्याला ही सवय असते
सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याची.

 🌹 💙💚💛💜🌹

जर स्वभाव हा
हॉटस्पॉट सारखा असला....
तर कुठल्याही पासवर्ड ची
गरज पडत नाही.
 
🌹 💙💚💛💜🌹

लोक आपोआपच जुळत जातात.
कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा
स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे असते.
 
🌹 💙💚💛💜🌹

प्रत्येक लहान हसू कोणाच्या तरी
हृदयाला स्पर्श करू शकते.
कोणीही आनंदी जन्माला येत नाही...
परंतु आपण सर्वजण आनंद निर्माण
करण्याची क्षमता घेऊन जन्माला
आलो आहोत.

 🌹 💙💚💛💜🌹

छोटेसे आयुष्य आहे,
मग थोडे वेगळे का असू नये.
आनंदी कसे राहावे याबद्दल सल्ला न देता....
आनंदी राहण्याचे कारण कारण बना.

🌹 💙💚💛💜🌹
 
चांगल्या वेळेपेक्षा
चांगली माणसे महत्वाची असतात.
कारण चांगल्या माणसांमुळे
चांगली वेळ अनेकदा येऊ शकते.
 
🌹 💙💚💛💜🌹

आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे....
कधीकधी तुमचा विश्वास नसतांनाही
तुम्ही आत्मविश्वासाने दिसले पाहिजे.....!
 
🌹 💙💚💛💜🌹

आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे
आपण जर हताश होऊन बसलो
तर पुढे आयुष्यात येणारी सुखे
आपल्यावर रुसून निघून जातील.
त्यामुळे जीवनातील प्रत्येक
अमूल्य क्षण आनंदाने जगा.
 
🌹 💙💚💛💜🌹


एकट्या सुईचा स्वभाव
टोचणारा असतो.... पण
सोबतीला जर धागा आला तर
हाच स्वभाव बदलून
एक दुसऱ्यांना जोडणारा बनतो....!

🌹 💙💚💛💜🌹
 
आपले तोंड पाहून कोणीही
आपल्याशी मैत्री करू शकतात.
परंतु आपले मन पाहून
आपल्याशी जे मैत्री करतात
ते लाखात एक असतात.

🌹 💙💚💛💜🌹

Post a Comment

0 Comments