अती गंभीर बनून आयुष्य जगू नका | Sunder Vichar Marathi | Good Thoughts

 💫अती गंभीर बनून आयुष्य जगू नका  

Sunder Vichar Marathi | Good Thoughts 💫


 अती गंभीर बनून आयुष्य जगू नका.
ही सृष्टी हजारो वर्षापासून आहे.
कित्येक आले आणि निघून ही गेले.
 💚🙏💜

मराठी-सुविचार-सुंदर-विचार-स्टेट्स-सुविचार-good-thoughts-in-marathi-on-life-vb
अती गंभीर बनून आयुष्य जगू नका | Sunder Vichar Marathi | Good Thoughts

कुणावाचून कुणाचे काहीच अडत नाही.
जे घडणार आहे ते तर घडून राहणार आहे.
तुम्हाला काही विचारुन घडणार नाही.
💚🙏💜
 
 या जगात आपले असे काहीच नसते....
त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करु नका.
मी अमका... मी तमका... असा अंहकार
अंगी बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने रहा.
💚🙏💜
 
धर्म.... जात... तत्व....
या गोष्टी मध्ये अडकून पडू नका....  
इथे स्वतःचा भरवसा नसतांना
इतरांना संपवण्याची भाषा बोलू नका.
💚🙏💜
 
इतिहासातील कुरापती काढून
आपला वर्तमान खराब करु नका.
त्यांचे आयुष्य ते जगले आणि
जग सोडून गेले.
तुम्ही तुमचे आयुष्य जगा
आणि इतरांनाही जगू द्या.
💚🙏💜
 
काळ आता बदलेला आहे.
आपली खरी गरज काय आहे...
ते ओळखा....!
उगाच फालतू गोष्टीत
आपली नाक खुपसू नका.
💚🙏💜


 
हजारों प्रकारचे संकट घोंघावत असतांना....
क्षुल्लक गोष्टींने विचलित होऊ नका.
आपले आयुष्य गंमतीने जगा....!
💚🙏💜
 
थोड़े मोकळे पणाने हसा.
 इतरांनाही आनंदी करा.
💚🙏💜
 
नेहमी लक्षात असू द्या की
तुमच्या गंभीरपणाने कुणाचेही
चांगले होणार नाही.
पूर्ण जगाचा विचार करू नका.
विनाकारण चिंता करु नका.
💚🙏💜
 
लहान सहान गोष्टींचा आनंद घ्या.
नेहमी गंभीर बनून राहू नका.
इतरांशी मस्त मोकळेपणाने बोला.
त्यामध्ये कमीपणा मानू नका.
💚🙏💜
 
तुम्ही स्वतः ला
जरी काही पण समजल असाल.....
तरी निसर्गाच्या समोर
तुम्ही केवळ एक जीव आहात.
विनाकारण कुणाचाही द्वेष करु नका.
सूडबुद्धीने वागू नका.
💚🙏💜
 
आपल्या आजुबाजुचे विश्व बघा.
किती गंमत आहे चारही बाजूला.....
मुंग्याची रांग बघा...
पाखरांचे थवे बघा......
बघा कावळ्याची स्वच्छता.....
💚🙏💜
 
खळखळणारा समुद्र
तुमच्या सोबतीला आहे......
त्याच्या उसळणाऱ्या लाटा
तुम्हाला खुणावत आहेत.......
💚🙏💜
 
जा उंच डोंगरावर.....!
किती प्रेमाने तो डोंगर
खांद्यावर खेळवतो.
💚🙏💜
 
विचारा त्या कोकीळेला....
इतकी सुंदर कशी गातेस.....?
💚🙏💜
 
वेगवेगळ्या रंगाची फूले बघा.
आपल्या जीवनात
वेगवेगळे रंग भरा.
एकसारखे आयुष्य जगू नका.
💚🙏💜
 
नवनवीन ठिकाणे.....
नवनवीन माणसे यांच्याशी
मित्रता करा.
💚🙏💜
 
प्राण्यांशी संपर्क ठेवा....
त्यांचे जगणे बघा.
कटकटी कमी करा.
अधिक आनंदी जगा....... !
💚🙏💜
 
आनंदाने जगण्यासाठी सर्वांना.....
मनमोकळ्या आभाळ भरुन शुभेच्छा....! 

🥀🥀🥀


अती गंभीर बनून आयुष्य जगू नका | Sunder Vichar Marathi | मराठी सुविचार | Good Thoughts In Marathi


आयुष्यात परिपक्वता [ Maturity ] कशी येते....! परिपक्व व्यक्तिमत्व [Mature personality ]


नमस्कार मित्रांनो... या पोस्ट मध्ये आपण वाचणार आहोत की आपल्या जीवनात 
परिपक्वता [ Maturity ] कशी येते....? 
आपले व्यक्तिमत्व परिपक्व [ Mature ] कसे होणार....?
 
माझ्या वाचनात आलेल्या आणि आपल्या जीवनात अनुभवलेल्या गोष्टी सांगत आहे.
 
 आपल्या जीवनात हे बदल घडविले तर नक्कीच जीवनात परिपक्वता [ Maturity ] येईल. 
आपले व्यक्तिमत्व परिपक्व [ Mature ] होणार. तर मग सुरु करूया....
 
१)    जेव्हा माणूस दुसऱ्यांची तुलना स्वतःबरोबर करणे बंद करतो तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात                परिपक्वता [ Maturity ] येते. अथवा तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
२)    जेव्हा माणूस परिस्थिती नुसार झालेल्या बदलाचा स्विकार करून समोर जाण्याचा 
      प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता [ Maturity ] येते. 
      अथवा तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
३)    एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा प्रत्येक माणसाचा विशिष्ट असा स्वतःचा एक वेगळा 
      दृष्टिकोन असतो. जेव्हा हे समजायला लागते तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात 
      परिपक्वता [ Maturity ] येते. अथवा तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
४)    जेव्हा माणूस... जे काही आपल्याजवळ आहे त्यातच आपले आनंद मानून 
      आयुष्यात तक्रारी करणे बंद करतो.... तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता
            [ Maturity ] येते. अथवा तो परिपक्व [ Mature ] होतो.

५)    जेव्हा माणूस दुसऱ्यांना बदलण्याऐवजी स्वतःमध्येच बदल घडवायला सुरुवात 
      करतो..... तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता [ Maturity ] येते. अथवा 
      तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
 
६) त्याच्या समोरची माणसे जशी आहेत तशीच त्यांचा जेव्हा माणूस  स्वीकार 
     करायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता [ Maturity ] 
     येते. अथवा तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
 
७) जेव्हा माणूस स्वतः च बोलण्या ऐवजी अगोदर समोरच्याचे ऐकून घ्यायला शिकतो  
     तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता [ Maturity ] येते. अथवा 
     तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
 
८) दर वेळी आपणच हुशार असल्याचा अट्टाहास आणणे जेव्हा माणूस बंद करतो तेव्हा 
     त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता [ Maturity ] येते. अथवा 
     तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
 
९) जेव्हा माणूस जबाबदाऱ्या स्वीकारायला आणि झालेल्या चुकांमधून पुढे जायला शिकतो
     तसेच आपल्या चुकांचे खापर इतरांवर फोडणे बंद करतो तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात 
     परिपक्वता [ Maturity ] येते. अथवा तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
१०) माणूस इतरांवर जळण्या ऐवजी स्वतःमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा 
       त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता [ Maturity ] येते. अथवा तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
११) जेव्हा माणूस आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समजूतदारपणाने वागण्याचा प्रयत्न 
       करतो.... तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता [ Maturity ] येते. अथवा 
       तो परिपक्व[ Mature ] होतो.
 
१२) जेव्हा माणूस एखादा निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता आपण घेतलेल्या 
       निर्णयाच्या बाजूने ठाम उभे राहायला शिकतो तेव्हा त्याच्या व्यक्तीमत्वात परिपक्वता
       [ Maturity ] येते. अथवा तो परिपक्व [ Mature ] होतो.
 
 परिपक्व असणे म्हणजेच  आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगात समजूतदारपणाने निर्णय घेणे....!
 
मित्रांनो.... 
जीवन खुप सुंदर आहे. आपणही आनंदाने जीवन जगा आणि दुसऱ्यालाही आनंदात 
जीवन जगु द्या. 

सर्वजण मस्त आनंदात राहा आपल्या समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम असू दया......!
व्यक्तीमत्वाला सुंदर बनविण्यासाठी वीस सुंदर विचार
20 prasnality Development Rules | सुविचार मराठी


नमस्कार मित्रांनो....
काळजीपूर्वक आणि शांत मनाने वाचावे असे खूप सुंदर वीस विचार आहेत जे व्यक्तिमत्व विकासासाठी खूपच महत्वाच्या ठरतील. तसेच समाजात वावरतांना जर या गोष्टी आपल्या आचरणात आणल्या तर नक्कीच तुमच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसतील आणि 
समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल.
 
१. जर तुम्ही एखाद्या कडून काही उधार घेतलेले आहे. जसे पैसे... पेन... छत्री... वैगरे.... 
     तर त्याने ते परत मागण्याच्या पूर्वीच तुम्ही परत करून टाका.
 
. जर एखादा तुम्हाला जेव्हा हॉटेल मध्ये जेवायला घेऊन जातो तेव्हा मेनूतील महागडा 
     पदार्थ ऑर्डर करू नका.... तर शक्य असल्यास पार्टी देणाऱ्यालाच ऑर्डर करायला सांगा.
 
३.  अजून ही तुझे लग्न झाले नाही.....? अजून पर्यंत तू घर बांधले नाहीस....
      अश्या प्रकारचे.... समोरच्याला एकदम अडचणीत टाकणारे प्रश्न कधीही विचारू नका. 
      कारण ती तुमची अडचण नाही आहे.
 

  ४. आपला सहकारी जेव्हा डॉक्टर कडे जातो आहे असे सांगितले तर....  कशासाठी....
     का म्हणून.....? असे प्रश्न विचारू नका, केवळ तु ठिक आहेस अशी आशा करतो एवढेच 
     म्हणा. जर त्याला सांगायचे असेल तर तो नक्कीच तुम्हाला सांगेल. तुम्ही त्याच्या 
     वैयक्तिक स्वरुपाच्या आजारा बद्दल विचारून त्याला लाजवू नका.
 
. तुम्ही जेवढा मान साहेबाला देता तेवढाच मान शिपायाला पण द्या. आपल्या 
    हाताखालच्या माणसांना तुम्ही कीती आदराची वागणूक देता यावर तुमच्या 
    व्यक्तिमत्वाची उंची ठरवली जाते.
 
. नेहमी आपल्या मागून येणाऱ्या व्यक्तीसाठी दरवाजा उघडा..... मग ती व्यक्ती 
    स्त्री असो अथवा पुरूष. कारण कुणाला चांगली वागणूक दिल्याने तुमचा 
    कमीपणा होत नाही.
 
 . सगळ्या राजकीय मतांचा आदर करा.
 
. कधीही कोणाच्या लठ्ठपणावर किंवा दुबळेपणावर टिप्पणी करू नका. फक्त म्हणा... 
    तु छान दिसतोस अथवा दिसतेस.... जर त्यांना आपले वजन कमी करायचे असेल 
    किंवा वाढवायचे असेल तर ते तुमच्याशी बोलतील.

 घर | एकदा नक्की बघा | मराठी सुंदर विचार

. कधीच कोणाचे संभाषण मध्येच खंडीत करू नका.
 
१०. जर एखादी व्यक्ती आपला फोन उचलत नसेल तर त्या व्यक्तीला दोन वेळापेक्षा 
      अधिक पुन्हा पुन्हा फोन करू नका. एकतर फोन त्या व्यक्ती जवळ नसेल किंवा  
     कदाचित त्या व्यक्तीला त्यावेळी तुमच्या फोनपेक्षाही दुसरे काही महत्त्वाचे काम असेल.
 
 ११. जो मदत करतो त्याला धन्यवाद द्या.
 
१२. एखादा माणूस आपल्याशी समोरासमोर बोलत असल्यास सतत मोबाईल मध्ये 
      लक्ष देणे ही अक्षम्य चूक ठरते.
 
 १३. जोपर्यंत एखाद्या विषयात तुम्हाला समाविष्ट केले जात नाही.... तोपर्यंत 
       त्या विषयापासून लांबच रहाणे योग्य.
 
 १४. एखाद्याची स्तुती नेहमी सगळ्यांसमोर करा परंतु त्याचे दोष त्याला एकट्यात सांगा.
 
 १५. जो पर्यंत तुम्हाला सल्ला मागितला जात नाही तो पर्यंत कुणालाही सल्ला देऊ नका.
 
१६. जर तुम्ही मित्रा बरोबर टॅक्सी शेअर केलीत आणि त्याचे भाडे त्याने दिले तर 
       पुढच्या वेळेस आठवणीने तुम्ही भाडे द्या... हाच नियम पार्टीसाठीही आहे.
 
घर | एकदा नक्की बघा | मराठी सुंदर विचार

१७. जेव्हा एखाद्याशी तुमची खूप वर्षांनी भेट होत असेल तेव्हा जोपर्यंत विषय निघत नाही 
       तोपर्यंत त्याचे उत्पन्न आणि वय याबाबत विचारू नका.
 
१८. जर तुम्ही कोणाची गंमत करीत असाल आणि त्या व्यक्तीला त्याचा 
       त्रास होत असेल तर ती गंमत लगेच थांबवा.
 
 १९. रस्त्यात कोणाची भेट झाल्यास काळा चष्मा काढून संभाषण सुरू करा, 
       ह्यातून आदर प्रतित होतो तसेच चांगल्या संभाषणाच्या दृष्टीने डोळ्यांचा संपर्क 
      आवश्यक असतो.
 
२०. जेव्हा एखादा तुम्हाला त्याच्या मोबाईल मधील फोटो दाखवीत असतो..... 
       तेव्हा कधीही डावीकडे वा उजवीकडे स्क्रोल करू नका. कारण तुम्हाला 
       काहीच कल्पना नसते पुढे काय दिसेल.
 
         ह्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी खूप आवश्यक आहेत.

व्यक्तीमत्वाला सुंदर बनविण्यासाठी वीस सुंदर विचार
20 prasnality Development Rules | सुविचार मराठी


Post a Comment

0 Comments