ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून लांब राहा | Sunder Vichar Marathi

 ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून लांब राहा | Sunder Vichar Marathi   

मृत्युपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले. माझ्या आजोबांनी मला दिलेले हे घड्याळ 
जवळजवळ दीडशे वर्ष जुने आहे.

आता हे घड्याळ मी तुला देत आहे. हे घडयाळ घेऊन तू आता दागिन्यांच्या
दुकानदाराकडे जा आणि त्यांना सांग की मला ही घड्याळ विकायची आहे.
ते आपल्याला काय किंमत देऊ शकतात ते बघ. मुलगा दागिन्यांच्या दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे आला आणि म्हणाला... 
ते मला या घड्याळाचे जास्तीत जास्त दोनशे रुपये देवू शकतात. कारण ही घड्याळ 
फार जुनी आहे.

यावर वडील म्हणाले ठीक आहे. आता तू हे घड्याळ घेऊन भंगारच्या दुकानदाराकडे जा. 
लगेच मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांजवळ येऊ सांगू लागला की... 
बाबा भंगारवाला जास्तीत जास्त तीस रुपये देवू शकतो. कारण ही घड्याळ खूप खराब 
झाले आहे.

आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात जायला सांगितले... मुलगा संग्रहालयात 
गेला आणि परत येतांना खूप आनंदाने घरी आलाम्हणाला बाबा संग्रहालय अध्यक्षाने म्हटले 
की.... या दुर्मिळ घड्याळाला त्यांच्या मौल्यवान वस्तू संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी आपल्याला पाच लाख रुपये देवू शकतात.

वडील अगदी शांतपणे स्मित हास्य करीत म्हणाले.... बाळा, मला तुला हेच सांगायचे होते की... योग्य ठिकाणी तुमचे योग्य मूल्य आहे.  स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका... आणि तुमचे 
मूल्य होत नसल्यास रागावू नका. 

ज्यांना आपले मूल्य माहित आहे ते आपली प्रशंसा करतात. आपले मूल्य जाणून घ्या. 
म्हणजे ज्यांना आपली किंमत नाही अशा व्यक्ती पासून लांबच राहा.Post a Comment

0 Comments