माझा बाळ बाल गणेश | पुत्रसुख...! | सुंदर विचार | Heart Touching Message

 माझा बाळ बाल गणेश | पुत्रसुख...! | सुंदर विचार 

एस.टी. थांबली.... कंडक्टरने एस.टी. चे दार उघडले.... आणि वामन काका दाराजवळ आले. 
हातात एक गोंडस बाल गणेशाची मुर्ती होती.... कंडक्टरने ते बघितले आणि काकांना 
आधार देत आंत घेतले. मागून दोन प्रवाशी चढले..! एस.टी.सुरु झाली.

कंडक्टरने ड्राईव्हरला ओरडून सांगितले.... " थोडे थांबा.... बाप्पा ची मुर्ती आहे....! "
ड्रायव्हरने एस.टी. थांबवली. आतील प्रवाशांनी मागे वळून मुर्तीकडे पाहिले.... 
ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हांत नकळत जोडले गेले. कंडक्टरने शेवटी 
वामन काकांना आपल्या शेजारी बसायला सांगितले... डबलबेल दिली... आणि 
एस.टी.सुरु झाली....!jai-shree-ganesh-vb-good-thoughts-vijay-bhagat-bal-ganesh
माझा बाळ बाल गणेश | पुत्रसुख...! | सुंदर विचार | Heart Touching Message 


कंडक्टर दुसऱ्यांची तिकीटे काढून झाल्यावर काकांजवळ बसला...!
काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मुर्ती असल्याने त्यांना पैसे काढता 
जमत नव्हते... तिकीट काढण्यासाठी त्याची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला...
" असू द्या काका..... उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मुर्ती ठेऊ. तेव्हा द्या."

काही अंतर जाताच कंडक्टरने विचारले.... "काका एक विचारु....? तुमच्या गावात 
बाप्पा ची मुर्ती मिळत असेलच ना....? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणे.... ते ही 
एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन....? "

वामन काकां हळूच हसले आणि म्हणाले....  " हो आमच्या गांवात ही मिळतात मुर्त्या
परंतु अशी नाही.... ही मुर्ती बघितली ना...? कशी गोंडस आहे...?  अगदी जिवंत वाटते..... 
जणू काही लहान बाळच.....!"
कंडक्टरने होकारार्थी मान हलवली आणि अगदी अंत:करणापासून पुन्हा हांत जोडले.... 
हलकासा स्पर्शही केला.

" साहेब... आम्हा नवरा - बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन आम्ही थकलो.... 
नंतर प्रारब्ध म्हणून सोडून दिले.... पंधरा वर्षापूर्वी कामानिमित्याने माझी बायको 
या गावी आली होती. तिने अशी मुर्ती या गावी बघितली आणि तिचे वात्सल्य जागे झाले... जणूकाही..... तिचे डोळे भरुन वाहू लागले..... तोंडातून नकळत शब्द फुटले
"माझे बाळ....
" हे असे घडल्यापासून... .ह्या गांवातून मुर्ती नेण्याचा हा नियम सुरु झाला. 

बायकोला सांधेदुखीचा त्रास असल्याने आता तिला प्रवास जमत नाही... म्हणून मूर्ती 
मी एकटाच आणतो "
कंडक्टर हे ऐकून चेहऱ्यावर आनंदाचे भाव आणून शांत झाला. काही वेळाने कंडक्टरने 
पुन्हा विचारले " पण काका तुमच्या गावात दाखवून घ्यायची ही मूर्ती.... साचा ने 
बनवून देतील गावांतच..."
" ते ही केले परंतु..... जास्त मुर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट..... आणि असे भाव येतीलच 
शाश्वती नाही "

हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे प्रवाशी ही ऐकत होते.... एका बाईने विचारले....
"काका मग मुर्तीला विसर्जितकरायची नाही......!"
वामन काका खुदकन हसले आणि म्हणाले... " विरहामुळे प्रेम उदंड पाझरते बायकोचे..! 
आत्ताही दारात वाट बघत बसली असेल. रांगोळी काय.... आंब्याची तोरणे काय..! 
भाकर तुकडा काय..... दृष्ट काढण्यासाठी....! त्याच्या कपड्यांची लहान बॅग आहे. 
लहान तांब्या भांडं काय..... विचारु नका..... मला तिचे ते सुख हिरावून घ्यायचे 
नाही आहे..."
यांवर कुणाचे डोळे पाणावले.... कुणी हलकेच हसले... नंतर मौन राहिले. काकांचे गांव आले. 
एक माणूस पुढे होऊन मुर्ती हातात घेतली आणि म्हणाला... "काका तुम्ही तिकीट काढा. 
तोपर्यंत मी पकडतो..." काहीजण त्या मुर्तीकडे जवळून बघत राहिले.... आता लोकांची 
नजरच बदललेली....
वामन काकांनी कंडक्टरला पैसे दिले " दिड तिकिट द्या.... एक हाफ आणि एक फुल "
कंडक्टरने आश्चर्यानने विचारले " दिड....? तुम्ही तर एकटेच आला आहात ना काका...? "
काकांनी हसत हसत म्हणाले... " आम्ही दोघे नाही का आलो...? मी आणि हा आमचा बालगणेश....? "
हे ऐकून सगळे प्रवाशी एकमेकांकडे पाहू लागले....!
काका म्हणाले, " असे कोड्यात का बरें पडलांत...? त्याला नमस्कार केलात. त्याला 
आपला देव मानता..... आणि प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो....
तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाही आहे....? तुमचा भाव जागृत झाला ना....
आपणच त्याला मातीची मुर्ती याच भावाने भजतो.... पूजतो.... अगदी पूजा 
केल्यावरही.... पण त्याला एकाचीच गरज आहे... आपल्या प्रेमाची.... 
आपल्या अलिंगनाची..... द्या दिड तिकिट.....!''  
हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरने दिड तिकीट दिले.....!
वामन काका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी.तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले 
आणि हांत नकळतपणे जोडले गेले
अगदी अनाहूतपणे.....!! 

तोंडातून नकळत शब्द फुटले माझे बाळ | पुत्र सुख | सुंदर विचार | हृदयस्पर्शी गोष्ट | VB Good Thoughts


जय श्री गणेश 
गणपती बाप्पा मोरया Post a Comment

0 Comments