नैराश्य ( Depression ) मधून एक व्यक्ती कसा बाहेर निघाला | Good Thoughts In Marathi On Life | Stress

नैराश्य ( Depression ) मधून एक व्यक्ती कसा बाहेर निघाला | 
Good Thoughts In Marathi On Life | Stress

जवळ जवळ साठ वर्ष वयाची एक व्यक्ती नैराश्याने ( डिप्रेशन ) ग्रासलेली होती. 

त्या व्यक्तीच्या बायकोने त्यांना एका मनोचिकित्सकाकडे (साईकियाट्रिस्ट) नेण्याचे 
ठरविले. ते मनोचिकित्सक जन्मकुंडली....  भविष्य ही बघत असत. बायकोने त्यांची 
भेट घेण्यासाठी वेळ मिळवली. 


नैराश्य-Depression-मधून-एक-व्यक्ती-कसा-बाहेर-निघाला-Good-Thoughts-In-Marathi-On-Life -Stress
नैराश्य-Depression-Good-Thoughts-In-Marathi-On-Life -Stress


 बायको म्हणाली :- साहेब, हे खुपच निराशाग्रस्त आहेत. यांची कुंडली ही बघा. आणि 
सांगितले की.... या सर्वामुळे माझीही तब्येत बरोबर राहत नाही.

 मनोचिकित्सकाने त्यांची कुंडली बघितली. त्यात ग्रहस्थिती वगैरे सर्व काही त्यांना 
चांगलेच दिसले. 
आता मनोचिकित्सक साहेबाने बोलायला सुरुवात केली. प्रथम नवरा – बायकोला 
काही व्यक्तिगत प्रश्न विचारले.... आणि त्या व्यक्तीच्या बायकोला बाहेर बसायला 
सांगितले.

प्रथम त्या व्यक्तीला बोलते केले... आता तो हळूहळू बोलायला लागला.
साहेब मी खुप त्रासात आहे.... काळजीच्या ओझ्याने पूर्णतः दबून गेलो आहे. 
नोकरी चा ताण...... मुलांचे शिक्षण आणि त्यांना चांगली नोकरी मिळेल की नाही 
याची काळजी.... घरासाठी घेतलेले कर्ज..... गाडीसाठी घेतलेले कर्ज... माझे कशातच 
मन लागत नाही...

लोकं मला खूपच यशस्वी व्यक्ती समजतात... परंतुरेतर माझ्याकडे काहीच नाही....
मी खूपच निराश आहे...  असे सांगता सांगता त्या व्यक्तीने आपल्या संपुर्ण जीवनाचे 
पुस्तक मनोचिकित्सक साहेबांजवळ उलगडून दिले.

मग त्या विद्वान चिकित्सकाने काही विचार केला आणि विचारले.... 
दहावी ला असतांना कोणत्या शाळेत शिकत होतात....
त्या व्यक्तीने आपल्या शाळेचे नाव सांगितले.

समोर चिकित्सक म्हणाले :- तुम्हाला तुमच्या शाळेत जावे लागेल. शाळेतून तुमच्या 
दहावी च्या वर्गाची नोंदवही (रजिस्टर) घेऊन या. त्या नोंदवहीत आपल्या मित्रांची 
नावे पाहा.... आणि त्यांना शोधून त्यांच्या आजच्या स्थितीची माहिती मिळविण्याचा 
प्रयत्न करा. 

सर्व माहिती एका वहीत लिहुन काढा आणि एका महिन्या ती माहिती घेऊन मला येऊन भेटा.
ती व्यक्ती आपल्या जुन्या शाळेत गेली, खुप विनंती करुन नोंदवही (रजिस्टर) शोधली आणि 
त्याची प्रत बनवून आणली. त्यात एकशे तीस नाव होते. एक महीना दिवस - रात्र प्रयत्न केले 
तरी पण मोठ्या मुश्किलीने आपल्या पंचाहत्तर ते ऐशी वर्गमित्रांच्या विषयी माहिती जमा करु शकले. त्याला मोठे आश्चर्य वाटले....

त्यांतील वीस मित्रांचा मृत्यू झालेला होता... सात मित्र/मैत्रीणी विधवा/विधुर आणि तेरा घटस्फोटीत होते... दहा मित्र नशेच्या इतक्या अधिन झाले होते की... ते बोलण्याच्या लायकीचेही नव्हते. 
काहींचा तर ठावठिकाणा ही माहित होत नव्हता.... पाच तर इतके गरीब होते की विचारता 
सोय नाही... सहा इतके श्रीमंत निघाले की विश्वासच बसत नव्हता.

काही कॅन्सर ने पिडीत होते.... काहींना अर्धांगवायू झाला होता.... कुणाला शुगर... कुणाला दमा 
तर कुणी हृदयविकाराच्या आजाराने त्रस्त होते. 

एक दोघांचा अपघात होऊन त्यात हात/पाय किंवा मणक्याचे हाड मोडून बिछान्यावर पडून होते.... काहींची मुले वेडी.... व्यसनी.... रिकामटेकडी.... कामातून गेलेली निघाली... एक कारागृहात 
कैदेत होता....!

एक साठ वर्षे वय झाल्यावर स्थिरस्थावर झाला होता म्हणून आता विवाहबद्ध होण्याच्या 
विचारात होता तर एक अजूनही स्थिरावू शकला नव्हता.... परंतु दोन घटस्फोट होऊन 
ही तिसरे लग्न करायच्या बेतात होता....

महीन्या भरात दहावी इयत्तेची नोंदवही (रजिस्टर) भाग्याची व्यथा स्वतः ऐकवत होती...
चिकित्सकाने विचारले :- आता सांगा.... तुम्हाला नैराश्य (डिप्रेशन) कसलेले आहे....?
या व्यक्ती च्या लक्षात आले की.... मला कुठलाही आजार नाही.... भुकेने मी मरत नाही..... 
माझे मेंदू अगदी ठणठणीत आहे.... कोर्टकचेरी पोलिस वकीलांशी माझा कधी संबंध 
आला नाही.... त्याची बायको आणि मुलं खूप चांगले आहेत.... स्वस्थ आहेत... 
तो ही स्वस्थ आहे.... डॉक्टर.... दवाखान्याची.... कधी गरज पडली नाही.
 
त्याला असे जाणविले की जगात खरंच खूपच दुःख आहे आणि मी खुप सुखी आणि नशिबवान आहे.... तेव्हा नैराश्य येण्यापासून दूर रहाण्यासाठी- दूसऱ्याच्या ताटात ढुंकून पहाण्याची सवय सोडून आपल्या ताटातील भोजन प्रेमाने ग्रहण करावे. तुलनात्मक विचार करु नये. 

सर्वांचे भाग्य वेगवेगळे असते. आणि अजून एक गोष्ट.... सांगीतल्या - ऐकलेल्या गोष्टींकडे 
दुर्लक्ष करावे.

Post a Comment

0 Comments