घर | एकदा नक्की बघा | मराठी सुंदर विचार | Good Thoughts In Marathi On Life

घर | एकदा नक्की बघा | मराठी सुंदर विचार | Good Thoughts In Marathi On Life

मित्रांनो, 
खुप सुंदर पोस्ट आहे... एकदा नक्की वाचा.....

हे काय केलंत बाबा..... तुम्ही पुर्ण फरशीवर चपलाचे ठसे उमटवलेत. रजनी ने आत्ताच 
ही फरशी पुसली होती आणि तुम्ही चपलाचे ठसे उमटवून टाकले. बाबा तुम्हाला थोडे 
तरी समजायला पाहिजे....? तुम्ही काही लहान बाळ नाहीत.sunder-vichar-good-thoughts-in-marathi-on-life-vijay-bhagat-vb-thoughts-ghar
घर | एकदा नक्की बघा | मराठी सुंदर विचार | Good Thoughts In Marathi On Life


आपली सुन आरती ने हे अशा कडक शब्दात सुनावलेले शब्द ऐकून अरविंद साहेब 
स्तब्ध राहीले. अरविंद साहेब पोलिस खात्यातून रिटायर्ड झाले होते. नोकरीत असतांना 
त्यांच्या एका आवाजाने गुन्हेगार थरथर कापत होते. आणि आज त्यांची सून त्यांच्याच 
घरात त्यांना इतके बोलत होती.

दाराच्या जवळच उभी असलेल्या त्यांच्या बायकोने त्यांना शांत राहण्याचा इशारा करीत 
आराम खुर्चीवर बसवले आणि म्हणाली...  काही मनावर घेऊ नका. आपली एकुलती 
सुन आहे. आपल्या सुनेचे बोलणे काय मनावर घ्यायचे...?
ती केवळ तोंडानेच थोडी फटकळ आहे.... बाकी तिच्या मनात तसे काही नसते.

अरविंद साहेब हलकेच हसले आणि बायको कविता कडे बघायला लागले.. 
जणू इशाऱ्याने विचारत आहेत की खरंच...? पण साहेबांच्या डोळ्याच्या कडा 
ओलावल्या होत्या.

आराम खुर्चीवर बसून ते विचार करायला लागले की.... किती आवडीने हे घर बांधले होते... 
या घराची एक एक वीट आपल्या मनाप्रमाणेने रचली होती. किती प्रेमाने घराला सजविले. जेणेकरून रिटायर्डमेंट नंतर नवरा बायको सर्व सोयी सुविधा युक्त घरात आरामात राहू या. 
पण हे काय आज त्यांचे सर्व विश्व त्यांच्या रूम पर्यंतच मर्यादित झाले होते. जर रूम च्या 
बाहर निघाले तर  किती ऐकावे लागत आहे त्यांना.

मुद्दामच हॉल मोठा ठेवला आणि कोपऱ्यात थंडीच्या दिवसात शेकोटी पेटवण्यासाठी 
आवडीने भिंतीत चिमणी (फायर प्लेस) बसवली होती... की हिवाळ्यात तेथे शेकोटी 
पेटवून शेकत शेकत कविता सोबत भाजलेल्या शेंगा खाऊ.... परंतु काय हिम्मत की... 
सुनबाई हिवाळ्यात शेकोटी पेटवू देईल. 

सुनबाई म्हणायची की पुर्ण घरात राखचे कण पसरतील... मग ती चिमनी तशीच 
रंगवलेली दिसायची.... एकदम नविन सारखी, कारण सुनेला ती तशीच आवडायची.

हा सर्व विचार त्यांच्या डोक्यात होता... की हातात कड़क चहा चा कप घेऊन कविता 
त्यांच्याजवळ येऊन बसल्या. त्या आपल्या नवऱ्याला चांगल्या ओळखून होत्या. 

त्यांना चांगल्याप्रकारे ठाऊक होते की साहेब आता रागात होते. आणि त्यांच्या हातची 
कडक चहा पिऊन त्यांचा राग शांत होऊन जाईल.


बिचारी कविताही काय करणार.... नवरा आणि मुलगा मयूर च्या प्रेमात अडकलेली 
एक भारतीय स्त्रीच होती. दोन्ही बाजू सांभाळत आपले दिवस काढत होती. 
कधी मुलाचे ऐकायची तर कधी नवऱ्याचे ऐकायची.

एक दिवस.... सकाळी फिरुन आल्यावर नवरा – बायको  दोघे दारा समोरील गवतावर 
खुर्ची लावून बसलेले होते. त्या दिवशी रविवार होता. नोकर चहा ठेवून गेला.... 
आज दोन कप ऐवजी चहाचे तीन कप पाहून साहेबांना थोडे वेगळे वाटले. कारण 
त्यांच्याशिवाय फक्त मयूरच चहा पित असे आणि तो त्यांच्या सोबत कधी चहा पीत नसे. 
त्याने त्यांच्यासोबत बसणे कधीचेच सोडले होते.... मग आज.....?

त्याच वेळी मयूर तिथे येऊन साहेबांजवळ बसला... आणि सोबत चहा पिऊ लागला. 
पण तिथे एक वेगळीच शांतता पसरलेली होती.

हा तोच मयूर आहे ज्याचे लहानपणी बोलणेच संपत नव्हते. साहेब ही कितीही थकलेले 
असोत.... तरीही मयूर सोबत खेळत असत.... तसेच मयूर बोलून बोलून जो पर्यंत थकून 
झोपत नाही तो पर्यंत त्यांच्या गोष्टीच संपत नसत. आज वेगळीच औपचारिकता 
वडील आणि मुला मध्ये बनलेली होती.


तेव्हा कविता शांती भंग करीत म्हणाल्या....  " मयूर पुढच्या महिन्यातच आरतीच्या 
भावाच्या मुलीचे लग्न आहे ना....?"

"हो आई... त्याविषयीच बोलायला आलो आहे. मुलाकडचे याच शहरातील आहेत आणि 
त्यांना लग्न याच शहरात करायचे आहे. म्हणून आरतीच्या कुटुंबाला लग्नासाठी हे घर 
पाहिजे आहे. आपले घर लग्न घर म्हणून पाहिजे आहे. 

म्हणून मला वाटते... जो पर्यंत घरात गर्दी राहिल तो पर्यंत तुम्ही दोघे ही ताई कडे जाऊन 
राहावे. तुम्हा दोघांना ही गर्दीमुळे त्रास होईल आणि ताई ही याच शहरात आहे म्हणून 
तुम्हाला काही त्रासही होणार नाही. तुमची दोघांची खोलीही त्यांना कामात येईल.

हे ऐकताच साहेब एकदम रागाने लाल झाले. तरीही आपला आवाज सामान्य ठेवत 
म्हणाले,  " तिच्या घरच्यांना भाड्याने दुसरे घर घेऊन दे, दहा पंधरा दिवसांसाठी. 
आम्ही कशाला दुसऱ्या ठिकाणी जाऊ....?"

बाबा... तुम्ही पण ना काहीही बोलता... आरतीच्या घरचे लोक आहेत. आपले इतके मोठे 
घर असून त्यांच्यासाठी दुसरे घर बघायचे....! आरती ने तर त्यांना सांगूनही दिले आहे. 
आता तुम्ही तुमचे पाहून घ्या..... ते इथेच येणार....." असे बोलून मयूर उठून घराच्या आत 
गेला. आतून सून आरती चा ही आवाज यायला लागला. बहुतेक तिने सर्व काही ऐकले 
होते आणि तिला साहेबांचे बोलणे आवडले नसावे.


आज कविता डोळ्यांतून अश्रू ढाळत होत्या.... साहेबांनी आपला खांदा पुढे केला....
जसे बायकोला म्हणत आहेत की " अजून मी आहे... सर्व बरोबर करून देईन. "

दूसऱ्या दिवशी साहेब संध्याकाळी फिरून घरी आले.... तेव्हा कविताने सांगितले की....  
मयूर, आरती आणि मुलांसह सुट्टी आहे म्हणून सासुरवाडीला गेला आहे.

साहेब हसले आणि म्हणाले, " बघ वेडी... हाच मुलगा आहे ज्याच्यासाठी तू नेहमी 
माझ्याशी भांडत होती... ज्याच्यासाठी कित्येक रात्र आपण जागून काढल्या आहेत.... 
आज ते आपल्यालाच आपल्या घरातून जायला सांगत आहेत. ठीक आहे... 
मी पण त्याचा बाप आहे." असे म्हणत घराच्या आत गेले.

एक आठवड्यानंतर मयूर सहपरिवार घरी परत आला तर घराला कुलुप लागलेले होते. 
पहारेकरी त्यांना पाहिल्यावर जवळ आला आणि एक चावी व चिठ्ठी मयूरच्या हातात दिली. 
मयूर चिठ्ठी उघडून वाचायला लागला.... ती चिठ्ठी साहेबांनी मयूर साठी लिहिली होती,

मयूर,
मी आणि तुझी आई चारधाम यात्रेला जात आहोत. अंदाजे परत यायला एक महिना लागेल. 
ही तुझ्या हातातील चावी या घराची नाही आहे. ती दुसऱ्या फ्लॅट ची आहे तुझ्या पूर्ण कुटुंबाचे 
सामान तिथे ठेवलेले आहे.

खूप आधी तो फ्लॅट मी विकत घेतला होता... तुला सांगीतले नव्हते. अगदी आधुनिक 
भागात आहे. तुमच्यासाठी चांगला आहे. जर नाही आवडला तर आपल्या सोयीने दुसरा 
घेऊन घ्या. 

हे घर माझे आणि तुझ्या आईचे आहे आणि आमचेच राहिल ही... यातून आम्हाला कुणीही 
नाही काढू शकणार.

आता पर्यंत मन मारून सर्व काही सहन करत होतो ते फक्त तुझी आई आनंदी रहावी 
म्हणून..... परंतु तुझ्या बोलण्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी आलेले मी कधीही सहन 
करणार नाही.

आमचे हे घर स्वप्नातील आहे.... ज्यात आम्हाला मुले... नातवंडांसोबत रहायचे होते.... 
परंतु भगवंताला हे मान्य नव्हते आणि तुम्हालाही आमची सोबत आवडत नव्हती. 
ते घर मी आणि तुझ्या आईकडून आशिर्वाद म्हणून दिले आहे. इच्छा असेल तर ठेवा 
नाही तर परत करा, आई-वडिल या नात्याने आम्ही आपला आत्मसम्मान सोडू 
नाही शकत.


आम्ही दोघेही मेल्यानंतर हे घर ट्रस्ट ला दिले जाईल.... ते इथे वृद्धाश्रम बनवणार...‌ 
या घरावर तुझा अथवा तुझ्या बहिणीचा काहीही अधिकार राहणार नाही. 
मी हे सर्व काही तुझ्या बहिणीला ही सांगितले आहे आणि ती माझ्या या निर्णयावर 
आनंदी आहे. आशा आहे तु ही आनंदीच असशील. तुम्ही सर्व आनंदी रहा.
तुझा बाबा

हे वाचल्यावर मयूर ला धक्काच बसला. डोळ्यात अश्रूधारा वाहू लागल्या.... 
आता हे माहीत नाही की ते अश्रू पश्चातापाचे होते की एवढे मोठे घर सोडावे लागत आहे 
म्हणून होते... की वडिलांच्या संपत्तीवर मुलांचाच अधिकार असतो.... विश्र्वास तुटल्यामुळे 
होते.... ते माहीत नाही.

नेहमी आनंदी रहा....!

जे प्राप्त आहे- ते पर्याप्त आहे....!

लेखक – अनामिक
विचार करायला लावणारा लेख

घर | एकदा नक्की बघा | मराठी सुंदर विचार
Good Thoughts In Marathi On Life
छान विचार मराठी


Post a Comment

0 Comments