असा माहेर देव प्रत्येक बहिणीच्या नशिबी देवो | सुंदर हृदयस्पर्शी गोष्ट

 देव असा माहेर प्रत्येक बहिणीच्या नशिबी देवो | सुंदर हृदयस्पर्शी गोष्ट   


आपल्या भावाने एक डुप्लेक्स घर विकत घेतला आहे हे कळल्यावर ती खूपच
आनंदी झाली. काय करावे आणि काय नाही हे तिला समजेनासे झाले....

आनंदाच्या भरातच भावाला फोन लावला पण फोन वहिनी ने उचलला...
ती थोडी दचकली.... पण स्वतःला सांभाळत म्हणाली.... वाहिनी मी येऊ का
नवीन घर पाहायला.....maher-good-thoughts-in-marathi-on-life-vb-vijay-bhagat
असा माहेर देव प्रत्येक बहिणीच्या नशिबी देवो | सुंदर हृदयस्पर्शी गोष्ट   

वाहिनी पटकन म्हणाली... अग आधी काम तर होऊ दे...  मग ये कि आरामात.....
वाहिनीचे हे उत्तर ऐकताच तिला थोडीसी नाराजी वाटली... परंतु काही दिवसातच
वाहिनी आणि भावाकडून वास्तुपूजन चे निमंत्रण आले आणि तिचा आनंद आता
गगनात मावेना....

भावाचे इतके मोठे आणि सुंदर सजवलेले घर बघून ती हरखून गेली....
वहिनीने केलेल्या सजावटीला पाहून मनोमनच बहिणीने आपल्या वाहिनीचे 
कौतुक केले. पण घरातील एका खोलीच्या बंद असलेल्या दाराकडे लक्ष गेले...

तिला विचार आला पूर्ण घर उघडे आहे आणि हि एकच खोली बंद का आहे...!
शेवटी न रहावून तिने वहिनीला विचारलेच.... वाहिनी हि खोली का बंद आहे....
वाहिनी म्हणाली.... त्यात थोडे काही महत्वाचे सामान आहेत...
वहिनीने असा उडवून लावणारे उत्तर दिले... त्यावेळी तिला खूप परक्या
सारखे वाटले....! परंतु स्वतःच स्वतःच्या मनाला समजावीत पाहुण्या रावळ्यात 
तिने आपले मन रमवले.....!

कथा – जेवण आटोपले.... सगळे पाहुणे विखरले..... आणि निघून गेले... 
आता घरी फक्त ती... भाऊ... आणि वहिनीच होते.... ती आपली शांत एका खोलीत 
सोफ्यावर बसली होती...

भाऊ वाहिनी खोलीत आले.... तिला सोबत घेऊन बाहेर आले आणि सरळ 
त्या बंद खोली समोर थांबून वाहिनीने हातात चावी दिली आणि भाऊ ने 
आपल्या बहिणीला दार उघडायला सांगितले...  

खोली उघडल्यावर आतील दृश्ये बघताच तिच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या....
त्या खोलीत तिच्या लहानपणीची खेळणी..... काही निवडक फोटो आणि तिची
एक मोठी फोटो भिंतीवर लावलेली होती...!

खोलीतील खिडक्यांना तिच्या आवडीच्या रंगाचे पडदे.... 
फुलदाणीत गुलाबाची फुले.... सगळे काही तिच्या आवडी प्रमाणेच.....
वहिनी जवळ येऊन हळूच गळ्यात हात टाकून म्हणाली...
तुझ्या शिवाय कसा पूर्ण होणार आमचा घर
जर तुझे माहेर जपले तरच घराला घरपण येईल.....
तुझ्या आई बाबांच्या नंतर ही.... तुला माहेर आहे.
आम्ही दोघे जो पर्यंत आहोत तो पर्यंत....! 
भाऊ आणि वाहिनीला एक कडकडून
मिठी मारली आणि भरल्या मनाने घरी परतली

खरेच काय पाहिजे असते जीवनात..... आपल्याला आपुलकी शिवाय.....!

माहेर | तुझ्या आई बाबांच्या नंतर ही तुला माहेर आहे | सुंदर हृदयस्पर्शी गोष्ट | सुंदर विचार | MaherPost a Comment

0 Comments