100+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार स्टेटस विथ इमेजेस | Motivational Suvichar Status with Images

 100+ जबरदस्त प्रेरणादायक सुविचार स्टेटस विथ इमेजेस

Motivational Suvichar Status with Images


नमस्कार मित्रांनो VB Good Thoughts या संकेतस्थळावर 
आपले मनापासून स्वागत आहे.

आयुष्यात खूप गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामध्ये प्रेरणा ही खूप महत्वाची असते. 
आयुष्यात ती प्रेरणा एखाद्या व्यक्तीकडून.... अथवा विचारांतून मिळत असते.

आयुष्यात खुपदा आपण निरास होतो, एखादे अपयश आले तर आपण तुटून जातो. 
अशा वेळी आपल्याया एक मायेचा हात आणि प्रेरणादाय सुविचार पाहिजे असते. 

हे सुविचार आयुष्यात उत्साह निर्माण करतात आणि अपयशाचा सामना करायला 
शिकवितात... तसेच नव्या शक्तीने पुन्हा प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा देतात.

 या पोस्ट मध्ये मराठी प्रेरणादायक सुविचार, मराठी स्टेट्स, रॉयल मराठी स्टेटस
जीवनावर मराठी स्टेटस, Marathi whatsapp status, Marathi status on life, 
मराठी सुविचार, लहान सुविचार, सुविचार संग्रह, Motivational Quotes
Positive Quotes, असा भरपूर सुविचारांचा संग्रह आणला आहे.

जो आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आपल्याला मदत करतील आणि तुम्हाला प्रेरणा देतील 
तसेच चांगले विचार, छान विचार मराठी, अशा प्रकारचे सुविचार संग्रह ही आहे. ज्यामध्ये आपल्यासाठी marathi status, suvichar, status suvichar, 
good thoughts in Marathi on life, sunder vichar, Marathi quotes
quotes on life in Marathiआणि बरेच काही या पोस्ट मध्ये तुम्हाला वाचायला मिळेल.

हे suvichar marathi status, suvichar Marathi, suvichar with photo
suvichar image in Marathi, तुम्हाला नक्कीच आवडतील,

हे सुविचार तुम्हाला Video रुपात आणि सुविचार फोटो, [Image] हि बघायला मिळेल.
तुमचे विचार कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्र मंडळी, नातेवाइक, 
इत्यादी सोबत शेयर करायला विसरू नका.
                                                                    🙏


marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-status-suvichar
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

लाखो क्षण अपूरे पडतात....
आयुष्याला दिशा देण्यासाठी.
मात्र एक चूक कारणीभूत ठरते
दिशाहीन होण्यासाठी.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

तुम्ही स्वतःला कितीही मोठे समजा....
परंतु दुसऱ्याला कमी समजण्याची
चूक कधीच करू नका...!

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

लोकांचे काय घेऊन बसायचे....
जाणारे गेलेत...
थांबणारे आहेत.....
येणारे येतील...
Just Move And Go Ahead   
आयुष्य खूप सुंदर आहे.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

जिवंत असताना मिळालेला एक खांदा
मेल्यानंतर मिळणाऱ्या चार खांद्या पेक्षा
सर्वश्रेष्ठ असतो.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

जबाबदारीची जाणीव झाली की....
बऱ्याचदा स्वप्नही बदलावी लागतात.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची
फिलॉसॉफी ही वेगळी असते.
कोणी वागायचे कसे शिकविते
तर कोणी जगायचे कसे शिकविते.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

जीवन फार थोडे आहे...
त्यामुळे प्रत्येक क्षणाचा
आनंद घेत चला.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

खरे बोलण्याची किंमत
काहीच मोठी नसते...!
फक्त एकटे राहण्याची
तयारी ठेवावी लागते...!

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

पुस्तकां शिवाय केला जाणारा
अभ्यास म्हणजे जीवन...! आणि 
जीवनात आलेले अनुभव म्हणजे पुस्तक...!

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

जेव्हा एखाद्या गरिबाचे काम
स्वतःच्या हातून होते....
तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर
जे समाधान असते...
तोच आपल्या जीवनातील
सर्वात मोठा 
सन्मान आणि सत्कार असतो...!

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

काही काही नाती ही अगदी
रांगोळी सारखीच असतात....
प्रदर्शन संपले की लगेच
पुसली जातात.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

आपण मान खाली घालून मोबाईल मध्ये
      अनोळखी जगात नाते तयार करीत असतो.
     मग खऱ्याखुऱ्या नात्यात थोडी मान खाली
घालण्यास हरकत का असावी...


प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

कारण नसतांना
गोड बोलण्याचे सोंग
करणारी माणसे म्हणजे
सावधानतेचा इशारा.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

मदत करायची जिद्द असली पाहिजे...
मग अडचणीत आपले असो अथवा परके...!
रक्तात माणुसकी पाहिजे.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

वर जातांना आपण
काय घेऊन जाणार आहोत...
असे म्हणणारा माणूस मात्र
खाली असतांना काही सोडत नाही...!

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  
 
यशस्वी होण्यासाठी शिकणे
आणि चुकणे दोन्ही महत्त्वाचे आहे...!

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

यशस्वी माणसाच्या सात सवयी....
१] इतरांना मदत करणे.
२] कृती करणे.
३] जबाबदारी स्वीकारणे.
४] मदत मागणे.
५] नकार देणे.
६] ध्यान करणे.
७] खरे बोलणें

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

शब्द खोटे बोलू शकतात...
परंतु कृती नेहमीच सत्य बोलते...!

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

संकटात रडण्याने
मन फक्त हलके होते....
संकटातून सुटका होण्यासाठी
झगडावे लागते.

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

        सुख तुम्ही कोणा सोबतही वाटावे.....
परंतु दुःख केवळ विश्वासाच्या
माणसालाच सांगावे...

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

सुखी जीवन जगायचे असेल तर
वेडे होऊन राहा... कारण
आजचे सत्य असे आहे की....
जो जवाबदारी स्वीकारतो
त्याच माणसाचे मरण होते... आणि
त्याच माणसाला परत लोक प्रश्न
करतात की...
तू केले तरी काय आमच्यासाठी....!

प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  

नजरेचा चांगुलपणा
असल्याशिवाय समोरच्याचा
आंतरिक सौंदर्य बघता येत नाही.


प्रेरणादायक-सुविचार-स्टेटस-विथ-इमेजेस-Motivational-Suvichar-Status-with-Images-vb-good-thoughts
motivational-quote-suvichar-status-sunder vichar  


काही काही नाती ही अगदी रांगोळी सारखीच असतात |
Marathi Status |
Suvichar | सुंदर विचार | चांगले विचार 

 जर आनंद नसेल तर ते जीवन जीवनच नाही...! | Sunder Vichar 


जीवनात सगळ्यांनाच आनंद पाहिजे असतो. खुपदा भौतिक गोष्टींतून तो
चांगल्या प्रकारे मिळेल...से आपल्याला वाटते आणि तो आणखी पाहिजे....
आणखी पाहिजे....से म्हणतांना किती लोकांच्या वाट्याचे आनंद
आपण एकटेच बळकावून बसतो ते कळेनासे होते.

खरा आनंद इतका सोपा नाही....!  तो अतिशय सखोल जागेतून उगम पावतो.

आपल्या जिवाभावाच्या माणसांच्या आनंदासाठी... शांततेसाठी..... आणि न्यायासाठी
जेव्हा आपण भांडतो तेव्हा आनंद आपल्याला सापडतो.

आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांत स्वप्नं असने आणि ती स्वप्न पूर्ण करायची
आस असणे यांतच खरा आनंद असतो.

मी खुप सुखी आहे.... आनंदी आहे..... समाधानी आहे....से आपण म्हणत असतो.... 
परंतु हे सुख... समाधान.... आनंद.... येते तरी कुठून....? 
जेव्हा आपलीच माणसे हे सुख.... समाधान..... आनंद....  देतात तेव्हाच ते 
आपल्या जवळ येते. हे नेहमी लक्षात ठेवावे...!

आपला सुख.... समाधान आनंद.... हे एकट्याचे नसते... किंवा उपजत आलेले नसते....
तर हे कुणीतरी आपल्याला दिलेले असते...! जीवनात आलेल्या जिवाभावाच्या 
माणसाकडून कुठल्या तरी प्रसंगातून.... लहान मोठ्या गोष्टीतून.... 
एखाद्या अनमोल घटनेतून.... निसर्गाच्या सान्निध्यात राहून..... 
आपल्याला मिळालेले असते....!

आनंदाची देवाण घेवाण असते... आनंद निर्माण करावा लागतो... 
तो कुणा जिवाभावाच्या माणसाला द्यावा लागतो..... कधी त्याच्या कडून घ्यावा लागतो...
आनंद कधी कधी कुठल्याही साध्या गोष्टीत.... शब्दात सुद्धा मिळू शकतो...! 
जर आनंद नसेल तर ते जीवन जीवनच नाही...!
 


 आनंद | Marathi Status | Suvichar | Sunder vichar | 


छान विचार मराठी | Good Thought In Marathi On Life


Motivational Suvichar Status with Images

 
सत्य आणि स्पष्ट बोलणारा
कडू वाटत असला तरी...
तो धोकेबाज कधीच नसतो.
त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला
गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला
विरोधक असतातच...!

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार 

ठाम राहायला शिकावे...
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की....
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

चमत्कार हे रोज होत असतात.
गरज आहे फक्त आपल्या
प्रामाणिक प्रयत्नांची आणि
अतूट विश्वासाची.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

प्रत्येक चांगल्या विचारांची
प्रथम चेष्टा होते.
मग त्याला विरोध होतो.
शेवटी त्याच विचारांचा
स्वीकार होतो.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

समजूतदारपणा आणि शांतता
हे वयावर नाही....
तर आयुष्यात आलेल्या
अनुभवावर अवलंबून असतात.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा
करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजे
यशस्वी होण्याचे पहिले पाऊल....!


marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

यशस्वी जीवनाची चार सूत्र
मेहनत केली तर धन मिळते.
संयम ठेवला तर काम होते.
गोड बोलले तर ओळख होते.
आदर केला तर नाव होते.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

मोठेपणा हा तो गुण आहे....
जो एखाद्या पदाने नाही
तर संस्काराने प्राप्त होतो...!

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

मानसिक शांती असेल तरच
सर्व काही गोड गोड वाटते.
नाहीतर धनाच्या राशीवर
लोळून सुद्धा ती टोचायला लागते....!

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

माणसाची माणुसकी 
तेव्हाच नष्ट होते
जेव्हा तो 
दुसऱ्याच्या दुःखावर 
हसत असतो....

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

जरी चांगल्या वागणुकीचे
आर्थिक मूल्य नसले...
तरी चांगल्या वागणुकीत
कोट्यावधींची मने जिंकण्याची
शक्ती असते.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

समजणे आणि समजून घेणे
यात खूप फरक आहे.
समजण्यासाठी बुद्धी लागते
आणि समजून घेण्यासाठी मन.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली
तरी चालेल... परंतु माझ्यामुळे
कुणाचे नुकसान व्हायला नको.


marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

प्रत्येकाच्या जीवनात रोज
काही ना काही समस्या
येणारच असतात. परंतु....
खरा विजेता तोच असतो...
जो या समस्यांवर मात करतो.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

जीवन सोपे नसते...
ते सोपे करायचे असते...!
थोडे संयम ठेवून....
थोडे सहन करून...
आणि खूप काही दुर्लक्ष करून...!

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

जिंकण्याची मजा तेव्हाच येते
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात...!

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

जगाचा कडवटपणा
कितीही अनुभवला असेल...
तरीही स्वतःमधला गोडवा
जगता यायला पाहिजे...

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

आयुष्यभर पुरेल इतके
मन भरून प्रेम मिळत असते.
तुम्ही फक्त ओंजळ पुढे करुन पहा.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

लोक म्हणतात तू नेहमी आनंदीच असतो...?
मी म्हणालो दुसऱ्याचे सुख बघून
मी जळत नाही. आणि माझे दुःख
कुणाला सांगत नाही...

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

वास्तवाचा स्वीकार करून जगण्यातच
खरा आनंद आहे. बाकी सगळा
जगासाठी मांडलेला दिखावा असतो...  

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

आज-उद्या करता करता
जीवन संपून जाते.
मनासारखे जगायचे
तेवढे मात्र राहून जाते.

marathi-motivational-quotes-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-मराठी-प्रेरणादायक-सुविचार
Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

 कितीही कमावून ठेवले तरीही
बाकी शून्यच राहते.... आणि
संकटाच्या वेळी कामात,
आपल्या कर्माने साठवलेले
पुण्यच येते.

Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

सुख आणि दुःख हे जीवनाची ऋतू आहेत...
केवळ अंतर इतकेच आहे की...  यांच्या
येण्याजाण्याच्या काल निश्चित नाही.

Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

सुंदर चेहऱ्यामागे पडण्यापेक्षा
सुंदर विचारां सोबत चालून पहा.
सुख जरी नाही मिळाले तरी
समाधान मात्र नक्कीच मिळेल...!

Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

जगातील सर्वात मोठी
प्रॉपर्टी म्हणजे....
आपले शरीर आहे.
जर ते चांगले असेल
तर आपण जगातील
कोणतीही प्रॉपर्टी
खरेदी करू शकतो.

Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसे
महत्त्वाची असतात कारण....
चांगल्या माणसामुळे चांगली वेळ
येऊ शकते.

Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

कधीकधी आपली चुकी नसतांनाही
आपण Sorry बोलतो. कारण....
मनात भीती असते...
आपल्या आवडत्या माणसाला गमावण्याची.

Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

आयुष्य असा एक रंगमंच आहे...
जिथे आपल्यालाच माहीत नसते की
आपली पुढील भूमिका काय आहे.

Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार

प्रत्येकात गुण आणि दोष असतातच
तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता....
हे महत्त्वाचे.

Motivational Suvichar Status with Images | सुंदर विचार


जगाचा कडवटपणा कितीही अनुभवला असेल | 

Marathi Status | Suvichar | Sunder vichar | Marathi Quotes 



नवरा हा खूप खोटारडा असतो | नवरा बायको सुंदर विचार 

नवरा नेहमी बायकोला बोलतो.....
एक दिवस तुला सोडून जाईल...
परंतु खरेतर नवरा
आपल्या बायको शिवाय
एक क्षण ही राहू शकत नाही.
नवरा हा खूप खोटारडा असतो...!
 
तू दिवसभर फोन चालवतेस म्हणून
साधा डब्बा फोन घेऊन देईन....
असे बोलतो परंतु गुपचूप
स्मार्टफोन आणून बायकोला
आनंदित करतो.
नवरा हा खूप खोटारडा असतो...!
 
बायकोने बनविलेल्या जेवणात
किती पण चुका काढणार...
परंतु जर बाहेर जेवणाचे आमंत्रण आले
तर ते सोडून घरीच जेवण करत असतो.
नवरा हा खूप खोटारडा असतो...!
 
बायकोच्या हौसाबद्दल आणि खर्चाबद्दल
नेहमी बोलेल.... परंतु जो पर्यंत
बायकोचे हौस पूर्ण करत नाही
तो पर्यंत शांत बसत नाही.
नवरा हा खूप खोटारडा असतो...!
 
माझ्या ऑफिसमध्ये खूप सुंदर सुंदर मुली आहेत.
असे बोलून बायकोला जळवतो... परंतु  
त्याच्या डोळ्यात आणि मनात बायकोच असते.
नवरा हा खूप खोटारडा असतो...!
 
मी खूप कठोर आहे.
असे बायकोला दाखवतो....
परंतु नेहमी बायकोच्या आनंदासाठी
बायको पुढे हारत असतो. काहीही म्हणा...  
नवरा खूप खोटारडा असतो....!
नवरा हा खूप खोटारडा असतो...!

नवरा हा खूप खोटारडा असतो | नवरा बायको सुंदर विचार
Marathi Status | Suvichar | Good Thoughts




 अगं  तु तर घरीच असते ना....! | स्त्री | सुंदर विचार 

अगं ऐकतेय का.......?
यामिनी – अश्विनी  ची  बस 
आज येणार नाही आहे...
मला लवकरात लवकर 
ऑफिस साठी निघायचे आहे...
आज या दोघींना तुच शाळेत सोडून दे 
आणि शाळा संपल्यावर तूच घरी आण
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
अगं ऐकतेय का....?  
माझा मोबाईल चार्जर मिळत नाही आहे....
फोन ची बैटरी पण लो आहे....
तू अस कर... 
आपला फोन नंतर चार्जिंग ला लाव.
तुझा मोबाईल चार्जर मला दे.
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
अगं आज मला ऑफिस ला 
थोडा लवकर जायचे आहे ...  
पेपर आधी मला वाचू दे.  
तु मग नंतर कधीही वाच.
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
ऑफिस मध्ये उद्याला माझा मालक येणार आहे.
      यामिनीची टेस्ट परीक्षा आहे. तिचा अभ्यास तुच घे.
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
तीन – चार दिवस मी खुप व्यस्त आहे .
 महिन्याचा शेवट आहे... 
ऑफिस मध्ये कामं आहेत...
आईची औषधी तुच आणुन घे...
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
 यामिनी – अश्विनी ची आंघोळ
त्यांचा – माझा नाश्ता...  
टिफिन ची तयारी तू आधी करत जा.
मधेच  तुझी घाई कशाला...?
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
ऑफिस मध्ये खूप काम आहे.... 
बुधवारच्या मुलांच्या शाळेतील
पालक मीटिंगमध्ये मला जायला 
जमणार नाही.
त्या मिटींगला तूच जा....
अगं तु तर घरीच असते ना....!
 
ए आई.... रिमोट  दे ना. 
मला थोडा टीव्ही  बघायचा आहे.
नंतर मला ट्युसन ला जायचे आहे... 
तु नंतर बघ ना....
 तुझ्या सिरियल्स पुन्हा दाखवितातच.....
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
आज ऑफिसवाल्यां सोबत 
जेवायला बाहेर जात आहे.
 आज तूच मुलींना फिरायला घेवून जा....
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
गावाकडील पाहुणे येत आहेत 
नागपूर फिरायला....!
मी तर ऑफिस मध्ये असतो....
परंतु त्यांना म्हटले आहे...
आमच्या कडे यायला...
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
मुली शाळेतुन आल्यावर 
आज मस्तपैकी मसाला भात कर...
आज अश्विनी चा वाढदिवस आहे ना....!
आराम तर रात्री ही होईल. 
आणि हो जमलेच तर केक पण करुन घे....
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
अग ऐकतेय का...? आज खुप थकलो आहे...
आले टाकून कडक एक कप चहा दे 
आणि जेवायलाही लवकरच वाढ.
होईल न स्वयंपाक पटकन....?
अगं  तु तर घरीच असते ना....!
 
घराबाहेर पडणाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीला प्रथम स्थान.....!
तिच्या प्रत्येक इच्छेला.... प्रत्येक आवडीनिवडीला 
दुय्यम स्थान....!
कारण ती घरीच असते ना....!
 
खरोखर का इतके सोपे असते....? घरी राहणे...???
 
मनाला भावलेली.... उमजलेली.... ही एक गोष्ट सगळ्यांसाठीच....
कृपया समजून घ्या... उमजुन घ्या.....!
स्त्रियांचा आदर करायला शिका....
कारण ती घरी असते.... म्हणूनच तर आपले घर हे घर असते....!

अगं तु तर घरीच असते ना... | मनाला भावलेला सुंदर विचार |
Sunder vichar | Good Thoughts In Marathi

 

Post a Comment

0 Comments