मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status | Marathi Suvichar | Sunder Vichar

 मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status | Marathi Suvichar | Sunder Vichar  


नमस्कार मित्रांनो, VB Good Thoughts या संकेतस्थळावर आपले 
मनापासून स्वागत आहे. 
good thoughts in marathi on life, suvichar marathi, 
motivational quotes in marathi on life, चांगले विचार, छान विचार मराठी, 
मनापासून शांतपणे वाचा.... खरोखर छान वाटणार.....

motivational-quotes-marathi-sunder-vichar-marathi-suvichar
motivational-quotes-marathi-sunder-vichar-marathi-suvichar

Marathi Status | Status Suvichar | Marathi Quotes | Motivational  Quotes   


चेक असो अथवा विश्वास....
जर तो गरजेच्या वेळी बाऊन्स झाला तर...
ना त्या व्यवहाराला किंमत राहते....
ना त्या नात्याला....

🥀💮🙋💛
 
उपकार कधीच विसरायचे नसतात हे मान्य आहे.
पण जर उद्या ती व्यक्ती त्याच्या फायदा घेत असेल....
तर मात्र अशावेळी समोरच्याची सन्मानाची टक्केवारी
आपणच ठरवायची हाच योग्य पर्याय असतो....!

🥀💮🙋💛
 
माणूस हा लागेपर्यंत झाडा जवळ आणि
आपले काम होईपर्यंत देवाजवळ थांबतो...!

🥀💮🙋💛
 
प्रत्येक पक्षाच्या चोची साठी देव हा
घास निर्माण करीत असतो...
परंतु तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही.

🥀💮🙋💛
 
आजचा दिवस
हा माझ्या जीवनाने मला दिलेली
शेवटची संधी असू शकेल....
उद्याच्या सुर्योदय
मी बघणारच याची काय खात्री...?
🥀💮🙋💛
 
ज्या नात्यात तुलना केली जाते...
त्या नात्यात दुरावा निश्चित होतो.

🥀💮🙋💛

Marathi Status | Status Suvichar | Marathi Quotes | Motivational  Quotes   

 
जो धन कमवीत असतो, तो धनवान....
ज्याच्या अंगी चांगले गुण असतात, तो गुणवान.....
ज्याला चांगली बुद्धी लाभलेली असते, तो बुद्धिमान.....
ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व असते. तो कर्तुत्ववान.....
ज्याने नाती जोडली आणि जपत असतो, तो मौल्यवान....
 
🥀💮🙋💛

जर आपले मन शांत असेल.......
तर दुसऱ्याचे मन समजून घेणे
सोपे जाते.

🥀💮🙋💛
 
मनाला असे तयार करा की....
त्याला कधी तडा जाणार नाही.
हास्य असे तयार करा की.....
त्याने मनाला त्रास होणार नाही.
स्पर्श असा करा की....
त्याने जखम होणार नाही.

🥀💮🙋💛

नाती अशी तयार करा की....
त्याचा शेवट कधीच होणार नाही.

🥀💮🙋💛
 
योग्य वेळेची वाट पाहत असाल
तर आयुष्यभर वाटच पाहत बसाल.यो
ग्य वेळेची वाट पाहत बसू नका
तर योग्य वेळ निर्माण करा.

🥀💮🙋💛

Marathi Status | Status Suvichar | Marathi Quotes | Motivational  Quotes   

 
चहा सारखे उकळ आहे जीवन....
कडकपणा आणि गोडवा येईलच
फक्त प्रमाण जमायला हवे.

🥀💮🙋💛
 
दोन्ही दगडावर 
हात ठेवणाऱ्या लोकांपासून
नेहमी सावध असलेले बरे.

🥀💮🙋💛
 
जे आहे ते स्वीकारून
त्यात समाधान शोधले की
त्याच्याशी सोहळा करता येतो...!

🥀💮🙋💛
 
कष्टातून वेचलेल्या आनंदाला
दृष्ट लावण्याचे सामर्थ्य
कोणाच्याच नजरेत नसते...

🥀💮🙋💛
 
सुख सगळ्यांजवळ आहे.
परंतु ते अनुभवायला वेळ नाही....!
इतरांकडे सोडा परंतु....
 स्वतःकडे बघायलाही वेळ नाही.....
जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत
आज जगायलाही वेळ नाही.....
आणि सगळ्यांची नावे
मोबाईल मध्ये सेव आहेत...
परंतु चार शब्द बोलायला वेळ नाही....!

🥀💮🙋💛

Marathi Status | Status Suvichar | Marathi Quotes | Motivational  Quotes   

 
 
पाण्याने भरलेल्या तलावात
मासे किड्यांना खातात आणि
जर तलाव कोरडा पडला तर
किडे माशांना खातात.
संधी सगळ्यांना मिळते
केवळ आपली वेळ येण्याची वाट पहा....

🥀💮🙋💛
 
जिथे आपण ठेच लागून पडतो...
तिथूनच सुरुवात होते
सांभाळून चालायची....

🥀💮🙋💛
 
जीवनाच्या वाटेवरचा प्रवास...
कधीच ठरवून होत नसतो.
जस जसी वळणे येतील...
तस तसे  वळावेच लागते.

🥀💮🙋💛
 
पैसा कमावून माणूस जास्तीत जास्त
श्रीमंत होऊ शकतो,  मोठा नाही.
मोठा होण्याकरिता आधी त्याला
विचाराने श्रीमंत व्हावे लागेल....!

🥀💮🙋💛
 
स्वतःच्या स्वप्नांसाठी कष्ट करा....
नाहीतर एक दिवस दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी
कष्ट करावे लागतील....

🥀💮🙋💛
 
जेव्हा कठीण काळात नियती आपल्याला
नाच नाचवित असते ना....
तेव्हा ढोल वाजविणारे काहीजण
आपल्या जवळचे असतात.

🥀💮🙋💛

Marathi Status | Status Suvichar | Marathi Quotes | Motivational  Quotes   

 
चुकीचा व्यक्ती जरी  कितीही गोड बोलला
तरी एक दिवस तो आपल्यासाठी
व्याधी बनून जाणार.
चांगला व्यक्ती जरी  कितीही कडू वाटत असला
तरी एक दिवस तो आपल्यासाठी
औषधी बनून कामात येणार.

🥀💮🙋💛
 
आनंद मिळविण्याचा
असा कोणताच मार्ग नाही आहे....
त्यापेक्षा आनंदी राहणे
हाच एक मार्ग आहे.

🥀💮🙋💛
 
सुख म्हणजे काय....?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे
आणि उद्याची चिंता न करणे.

🥀💮🙋💛
 
स्वतःच्या मनावर
इतका संयम असायला हवा की
परिस्थिती कितीही वाईट असली...
तरी इतरांबद्दल नेहमी
चांगला विचार करता आला पाहिजे...!

🥀💮🙋💛
 
मानवी स्वभाव असा आहे की...
जर विश्वास असेल तर न बोलता ही
सर्व काही समजून घेता येते आणि
विश्वास नसेल तर बोललेल्या
प्रत्येक शब्दाचा विपरीत अर्थ घेतला जातो...

🥀💮🙋💛

आपण किती आयुष्य जगलात....
ह्यापेक्षा आपणसे आयुष्य जगलात
याला अधिक महत्त्व आहे.

🥀💮🙋💛
 
जे सत्याने मिळते....
तेच जीवनभर टिकते.

🥀💮🙋💛
 
नात्यांमध्ये जर काही
गैरसमज होत असतील....
तर ते लगेच एकमेकांना
सांगून टाका.
कारण नाते तुटण्यासाठी
हाच पाच अक्षरांचा शब्द
पुरेशा असतो...

🥀💮🙋💛

चुकीचे असून स्वःताला बरोबर सिद्ध करणे
सोपे अससे. परंतु बरोबर असून सुद्धा
स्वतःला बरोबर सिद्ध करने खूप कठीण असते.

🥀💮🙋💛
 
जर व्यवहारात आपल्याकडून
एखादी चूक झाली तर...
आपण तिथे वकिलाची भूमिका घेतो.
आणि ती चूक जर दुसर्‍या कडून झाली तर...
आपण तिथे सरळ न्यायाधीश ची भूमिका घेतो...

🥀💮🙋💛
 
श्रीमंतीत आदराने झुकायला आणि
गरिबीत खंबीर राहायला ज्याला जमते...
तोच खरा माणूस होय...

🥀💮🙋💛
 
विस्कटलेल्या नात्यांना जोडण्यासाठी
प्रेमाची गरज भासते.
विखुरलेल्या माणसांना शोधायला
विश्वासाची साथ लागते.
प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळी
माणसे येतात.... परंतु जी पाहिजे
ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.
 
🥀💮🙋💛

चांगला गुरु
यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो...
पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी
स्वतःला चालावे लागते.

🥀💮🙋💛
 
सत्य की अशी एक श्रीमंती आहे की....
जी एकदाच खर्च करून त्याचा जीवनभर
आनंद उपभोगता येतो. पण असत्य हे
एक प्रकारचे कर्ज आहे.... ज्यामुळे
तत्काळ सुख मिळते. परंतु जीवनभर  
त्याची परतफेड करावी लागते.
 
🥀💮🙋💛

कधीही चांगल्या व्यक्तींची परीक्षा घेऊ नका.
त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला कधीच
दाखवणार नाहीत. ते तुमच्या आनंदासाठी
तुमच्या जीवनातून शांतपणे निघून गेलेले असतात...!
 
🥀💮🙋💛

जीवनात दुःख कितीही असले तरी....
त्यातून आनंद शोधता आला पाहिजे.
यालाच तर जीवन म्हणतात.
 
🥀💮🙋💛

मन "मानी" असावे....
"मनमानी" नसावे......!
 
🥀💮🙋💛

जरी खिसा रिकामा असला तरी
पैशाला कधीही नाही न म्हणणाऱ्या
वडिलांपेक्षा श्रीमंत माणूस या जगात
असूच शकत नाही...

🥀💮🙋💛
 
जीवनात आनंदी क्षणांसाठी....
पैशाने कमावलेल्या वस्तू पेक्षा
स्वभावाने कमावलेली माणसे
जास्त सुख देतात....
 
🥀💮🙋💛

कधीकधी काही निर्णय हे
इतरांच्या आनंदासाठी पण
घ्यावे लागतात...

🥀💮🙋💛

मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status | Suvichar | Sunder vichar |
सुविचार संग्रह | Good Thoughts

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा...
आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.

शब्दच जपून ठेवतात....
त्या गोड़ आठवणी. आणि
शब्दांमुळेच तरळते....
कधीतरी डोळ्यात पाणी.

म्हणूनच जो जीभ जिंकेल....
तो मन जिंकेल. आणि
जो मन जिंकेल.... तो जग जिंकेल.

आपला दिवस आनंदात जाओ....!

🥀💮🙋💛

शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा | Marathi Status |
Suvichar status video |
Sunder vichar | Good Thoughts In Marathi

आयुष्यात खिशा रिकामा असतांना
येणारा अनुभव आणि वेळ आणि
त्या काळात साथ देणारी माणसे
हिच खरी कमाई.
प्रत्येकाच्या मनगटावर घड्याळ असते.
पण वेळेला थांबविण्याची हिंमत
कुणाच्याही मनगटात नसते.


🥀💮🙋💛

Marathi Status | Status Suvichar | आयुष्यात खिसा रिकामा असतांना |
सुंदर विचार | शुभ सकाळ मित्रांनो

मनापासून शांतपणे वाचा | Marathi Status | Marathi Suvichar | Sunder Vichar 

परिश्रम करतांना
जिंकायला थोडा उशीर होतो....
परंतु परिश्रम कधीही हारत नाही...
 
🥀💮🙋💛

परिश्रम करीत असतांना
कधीही घाबरायचे नसते....
कारण माणूस त्या काळात
एकटाच असतो...
यशस्वी झाल्यावर तर
पूर्ण जग बरोबर असते...
मग सर्व गाणी बरोबर वाजतात...!

🥀💮🙋💛

हवा.... दहशत..... दरारा....
ही सगळी मोहमाया आहे.
काम करा... परिश्रम करा....
पैसे कमवा.... आपोआप
सगळी गाणी वाजतील.

🥀💮🙋💛

शब्द तर फुकट मिळत असतात....
परंतु तुम्ही ते ज्यानुसार वापरता
त्यानुसारच तुम्हांला त्यांची किंमत
चुकवावी लागते....!

🥀💮🙋💛


 
एका शब्दाचे अर्थ दोन असतात....
त्यामुळे जपून बोलावे. 
🥀💮🙋💛
 
रागा मागचे प्रेम आणि
चेष्टेमागचा जिव्हाळा
ज्या नात्यात समजून घेतला जातो....
ते नाते सहसा तुटत नसतात.

🥀💮🙋💛

नजरेत तुम्ही बसा आम्ही तर
काळजात बसणार...
ते ही अगदी रुबाबात....!

🥀💮🙋💛

प्रत्येकाशी प्रेमाने वागा
आदर न मागताही मिळते....
यालाच तर रुबाब म्हणतात...!

🥀💮🙋💛

डोक्यामध्ये विचारांचा ट्रैफिक
जीतका कमी असणार.....
आयुष्याचा प्रवास तितकाच
सोपा होणार.

🥀💮🙋💛
 
यशाचा एकमेव मार्ग संघर्ष आहे....
जर तुम्हाला जीवनामध्ये
अधिक संघर्ष करावा लागत असेल...
तर स्वतःला खूप नशिबवान समजा.
कारण संघर्ष करण्याची संधी
त्यांनाच मिळते.....
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.

🥀💮🙋💛

सत्याला अपमान तेच मानतात...
ज्यांना असत्यापासुन काहीतरी
लाभ मिळत असतो.

🥀💮🙋💛
 
मनाची आणि शरीराची
प्रक्षुब्ध अवस्था म्हणजे भावना....!
भावनाच वर्तनाला मार्गदर्शन करते.
 
🥀💮🙋💛

जर नीतिचा आधार घेतला...
तर जीवन जगणे सरळ
आणि सोपे होते...
 
🥀💮🙋💛

निसर्गाच्या न्यायामध्ये ना
काहीही होत असते...
असे वाटते की जादू आहे.....
असेही चांगले लोक दया
करण्यास सक्षम असणे
हा आधीच एक आशीर्वाद असतो....!
 
🥀💮🙋💛

स्वत:ला आपण कधीही
मिठीत घेऊ शकत नाही.
कधीही स्वत:च्या खांद्यावर
आपलेच डोके ठेऊन
रडू ही शकत नाही.
एकमेकांसाठी जगणे यालाच तर
आयुष्य” म्हणतात. म्हणून...
त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर
स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात....!

🥀💮🙋💛

 
विचारांचे काहूर आणि भावनांचा कल्लोळ
यांचे एक दुष्टचक्र आपोआप काम करू लागते.
त्यावेळेस मरणोत्तर यातनेतून जावे लागते.
त्या वेगळे देखील आपणच परंतु जेव्हा आपण हसतो....!
 
🥀💮🙋💛

मोठा मोठा श्वास घेत
आपण आपलेच मन
ताब्यात ठेवायचे असते.
कारण की...
हे हळूहळू सौम्य होत जाते.

🥀💮🙋💛

इतरांसाठी खुले व्हायच्या ऐवजी...
स्वत: साठी खुले व्हायचे.
लोकांना संधी द्यायच्या ऐवजी....
स्वत:लाच संधी द्यायची.
स्वतःसाठी मोकळे व्हायचे....
स्वतःला एक संधी द्यायची.

🥀💮🙋💛
 
प्रत्येक भावना मागे भीती असते.
अनेकदा ती कुठल्याही
जाणीवपूर्वक गोष्टींनी किंवा
कारणांनी येते असे नाही..
सुप्त मनात दडलेल्या तणावांमुळे
अचानक येऊ शकते...
त्यामुळे त्याच्याकडे वेळीच लक्ष देणे
आणि उपाय करणे महत्त्वाचे आहे..
 
नाहीतर असेही जीवनाचे अश्व
पळायला कारणच लागते..

🥀💮🙋💛

आपला प्रवास प्रत्येकाला समजेलच असे नाही....
ठीक आहे.... आपण आपले जीवन जगण्यासाठी
येथे आहोत. प्रत्येकाला समजवण्यासाठी नाही.
 
🥀💮🙋💛

आपल्याला यातले काहीच माहित नाही...
असे म्हणणाऱ्यालाच आतले बरेच काही
माहिती असते....! 

🥀💮🙋💛

 
कपड्यांना मॅचिंग करून...
केवळ शरीर सुंदर दिसेल.
कोणत्याही परिस्थितीतून
चांगले नाते.... चांगले लोक....
मॅचिंग करा.
 संपूर्ण जीवन सुंदर होते.

🥀💮🙋💛
 
प्रत्येकाच्या स्वभावात
काही चांगले गुण आणि
काही वाईट दोष असतातच.
तुमचे चांगले गुण लोकांना
दिसावेतच. कारण काही छोटे
दोष त्यामुळे झाकले जातात.

🥀💮🙋💛
 
संधी आणि सूर्योदय
दोन्हीत एक साम्य आहे...
उशिरा जागे होणाऱ्याच्या
नशिबी दोन्ही नसतात.

🥀💮🙋💛
 
पैशाने पुर्ण झालेली स्वप्न
मरेपर्यंत टिकतात.
कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न
इतिहास घडवितात.

🥀💮🙋💛
 
कल्पनेतील विचार
वास्तवात येत नाहित.
आणि वास्तव विचार
कुणाला पटत नाहीत.

🥀💮🙋💛
 
जे मिळालेले आहे
ते सांभाळून ठेवावे
आणि जे मिळवायचे आहे
त्यासाठी प्रयत्न करत राहावे.
 
🥀💮🙋💛

दररोजच्या आयुष्यात फक्त
पैसेच कमवीत न बसावे....
आता किती श्वास शिल्लक
आहेत कधीतरी हे ही  बघावे.
 
🥀💮🙋💛

गेलेले दिवस परत येत नाहीत
आणि येणारे दिवस कसे येणार
हे सांगता येत नाही म्हणूनच
जीवन जगा.

🥀💮🙋💛
 
मन वाचता आले की....
शांततेला सुद्धा वाचा फुटते.
 
🥀💮🙋💛

आपल्या तुटल्याची वाट पाहणारी लोकं
परकी नसून आपलीच माणसे असतात.
 
🥀💮🙋💛

विचारांवर लक्ष ठेवा... त्यांचे शब्द होतात.
शब्दांवर लक्ष ठेवा.... ते कृतीत उतरतात.
कृती वर लक्ष ठेवा... त्या सवयी बनतात.
सवयींवर लक्ष ठेवा.... त्यातून चारित्र्य घडते.
चारित्र्यावर लक्ष ठेवा... ते आपले  भविष्य घडविते.
 
🥀💮🙋💛

ज्यावेळी काहीच नसते.... त्यावेळी अभाव नडतो.
ज्यावेळी थोडेसे असते.... त्यावेळी भाव नडतो.
आयुष्यातील एक कटुसत्य आहे....  ज्यावेळी.....
सगळे काही असते... त्यावेळी स्वभाव नडतो....!
 
🥀💮🙋💛

केवळ एकच पर्याय कधीही नसतो.
पर्यायांची जगात कमी नाही आहे.
तुम्ही हार मानू नका आणि शिकत राहा.

Post a Comment

0 Comments