25+ [ Best ] Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life

{ Best } Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 


आयुष्य हे गुलाबाच्या फुलासारखे असावे
कुस्करनाऱ्याला ही त्याने सुगंधच द्यावे.

आयुष्य-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 


हाताला न लागणाऱ्या 
स्वप्नांच्या मागेही 
कधी तरी धावून पहावे... 
जगणे अजूनही सुंदर वाटते.

स्वप्न-जगणे-सुंदर-वाटते-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 


जर ताकात लोणी आहे तर चालेल
परंतु लोण्यात ताक नसावें.
जर कोळश्यात हिरा आहे तर चालेल
परंतु हिऱ्यात कोळसा नसावा.
जर पाण्यात बोट आहे तर चालेल
परंतु बोटीत पाणी नसावें.
त्याच प्रमाणे जर राजकारणात मैत्री
आहे तर चालेल परंतु मैत्रीत राजकारण नसावे.

मैत्री-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 

 
दिवश कितीही त्रासदायक असले.... 
तरीही भावना अबाधित ठेवाव्या लागतात.

भावना-अबाधित-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 

 
चेहरा बघण्या पेक्षा सदैव समोरच्याच्या
मनात उतरून बघावे, कारण....
सुदंरता हि वयाच्या बरोबर् संपत जाते...
शेवट पर्यंत टिकतो तो माणसाचा स्वभाव...!

सुंदरता-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 


प्रत्येक माणसामध्ये  गुणवत्ता
आणि कमतरता दोन्हीही असतात.
अंतर फक्त इतकाच असतो...
जो पारखून घेतो त्याला गुणवत्ता दिसते
आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते.

गुणवत्ता-कमतरता-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 


आयुष्य जगत असतांना खरेतर 
बसच्या वाहका सारखे राहता आलें पाहिजे.
दरदिवशी वेगवेगळ्या प्रवाशांची सोबत असते... 
परंतु प्रत्यक्षात कुणीही सोबत नाही आहे.
प्रवास रोजचाच आहे परंतु आपल्याला 
प्रत्यक्षात कुठेही जायचे नाही आहे.
ज्या बसमधून आपण प्रवास करतो... 
ती ही आपली नाही आहे.
बॅगेत असलेले पैसेही आपले नाही आहेत.
काम संपल्यावर सगळे काही सुपूर्द केले की झाले.

आयुष्य-जगत-असतांना-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 


एक दिवस असा उगवेल की तुम्हाला जीवनात 
जे काही करायचे होते ते करण्यासाठी वेळच 
उरणार नाही. 
म्हणून जे काही करायचे ते आत्ताच करा.

आत्ताच-करा-जीवन-जगा-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 


कुणाच्या बोलण्याच्या किंवा लिहिण्याच्या शब्दात 
चुका शोधू नका. कारण त्या शब्दांपेक्षा त्याच्या 
भावना अनमोल असतात. 
शब्द ठरवता येतात. भावना ठरवून येत नाहीत.

भावना-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 


स्वप्न तर फुकटच असतात..... 
फक्त त्यांचा पाठलाग करीत असतांना 
किंमत मोजावी लागते.

स्वप्न-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 

 
जर नाही बनता आले कुणाचे सूर्य 
तर लहानसा काजवा तरी बनावे. 
इतका उजेड पुरेसा असतो 
अंधारातले शिखर गाठायला.

आधार-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts
Marathi Suvichar With Images | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi on Life 

प्रत्येक प्रयत्नांमध्ये 
जिंकता तर येत नाही....
परंतु प्रत्येक प्रयत्नांमधून 
लढण्याचे कौशल्य 
नक्कीच शिकता येते.

प्रयत्न-जिंकणे-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts

 
प्रयत्न करूनही चुकलात तरी चालेल... 
परंतु प्रयत्न करण्यास कधीही चुकु नये. 
कारण हिंमत नाही तर किंमत नाही.  
विरोधक नाहीत तर प्रगती ही नाही.

प्रयत्न-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts

 
आपण तोंडाने काही गोष्टी 
किती ही खोट्या बोललो... 
तरी पण खरे काय आहे 
हे आपलेच डोळे सांगून जातात.

Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts-डोळे
 
जेव्हा आपल्याला सगळे काही संपले आहे 
असे वाटते तीच वेळ खरी असते 
नवीन काहीतरी सुरू होण्याची.

वेळ-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts

 
जसे थंड पाणी आणि गरम इस्त्री 
कपड्यांवरच्या सुरकुत्या मिटवून टाकतात  
अगदी तसेच शांत डोके आणि उबदार मन 
जीवनातील चिंता मिटवतात.

चिंता-Marathi-Suvichar-With-Images -सुंदर विचार-Good-Thoughts-In-Marathi-on-Life-vb-good-thoughts

जर दिव्याने दिवा लावत गेले तर 
दिव्यांची एक दिपमाळ तयार होते. 
जर फुलाला फुल जोडत गेले तर 
फुलांचा एक हार तयार होतो. आणि 
जर माणसाला माणूस जोडत गेले तर 
माणुसकीचे एक सुंदर नाते तयार होते.

मित्रांनो जीवनात नाते खूप महत्त्वाचे असते.... 
समाजात वावरतांना प्रत्येक पावलांवर आपल्याला एक नाते मिळते. 
माणूस या जगात येताच नाते आपोआप बनतात.
जन्मतःच आई-वडील , काका - काकू , आजी -आजोबा असे नाते मिळतात. 

 जस जसे आपण मोठे होतो तसतसे काही नवीन नाते जीवनात बनतात. या पोस्टमध्ये आपण 
असेच काही नाते आणि त्यांचे थोडे महत्व बघूया. कोणत्याही नात्याचे महत्व शब्दात 
मांडता येत नाही. तरीपण माझ्या वाचनात आलेले काही नाते आणि त्यांचे महत्व तुमच्या 
सोबत शेयर करीत आहे आणि मला विश्वास आहे हे तुम्हाला नक्कीच आवडेल. 
आणि जीवनात नाते साभाळने किती गरजेचे आहे हे ही कळणार. 
तर मग वाचायला सुरुवात करूया की..... 

काय नाती  असतात....!

 ।। आई- वडील ।।


सर्व काळातील सर्वश्रेष्ठ असे मानवीय नाते.
पंचमहाभूताच्या पलिकडचे सहावे महाभूते.... आपल्या घरचे जिवंत देव [ दैवत ] 
तीर्थाचे सागर.... स्नेहाचे आगर.... आपल्या मुलामुलींसाठी स्वतःचे आयुष्य विसरणारी 
त्यागाची मूर्ती.... आपण जन्माला येण्या आधीपासूनच आपल्यावर प्रेमाचे सिंचन करणारे. 
प्रेम आणि काळजी घेणारे.... आपल्या सुखमय भविष्याची काळजी करणारे... 
आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांची होळी करणारे नाते म्हणजे आपले 
आई - वडील  

 

      ।। काका - काकू ।।

आई वडिलांच्या नंतर दुसरे नाते म्हणजे आई वडिलांचे धाकटे भाऊ आणि सून 
आणि आमचे काका काकू. आई वडिलांच्या नंतर त्यांची कमतरता न भासू देणारे 
प्रेमाचे सागर - सरिता. निर्मल प्रेम करणारे काका - काकू 

 ।। आजी - आजोबा ।।

वडिलांचे आई - बाबा आणि आई चे आई - बाबा म्हणजे आमचे आजी आजोबा. आमची 
जीवन बाग फुलविणारे माळी. आम्हाला भरपूर लाड करणारे... नेहमी आमची बाजू घेणारे... 
आमची चूक असतांनाही आमच्या बाजूने उभे राहणारे.... आणि आमची चूक लक्षात आणून 
आम्हाला योग्य मार्ग दाखविणारे.... 
आपले बालपण आमच्यात बघणारी प्रेमाची मूर्ती.... 

       ।। बहिण ।।

बहिण..... आई ची सावली.... घरात उत्सव / सण साजरे करण्यात अग्रसर आणि 
उत्सवाने / सण साजरा केल्याने आनंदी होणारी..... संपुर्ण कुटुंबात प्रेमाचा... 
स्नेहाचा.... सुगंध पसरवणारी..... आयुष्यात कशीही परिस्थिती आल्यावर आपल्या चांगुलपणाचा विचार करणारी आपली हितचिंतिका. आपल्या सोबत भांडणारी पण 
आपल्यावर जिवापाड प्रेम करणारी....म्हणजेच आपली लाडकी बहिण

 ।। भाऊ ।।

भाऊ...... आपल्या हिंमत देणारे हक्काचे व्यासपीठ...... आपली ताकद.... 
सामर्थ्य.... सुरक्षा.......यांचा निसर्गाने दिलेला एक नैसर्गिक आवरण.
आपल्या शक्तीचे कवच कुंडल. आपल्या आवाजातील मजबूतपणा. 
 

        ।। गुरुजन [ गुरुजी ]  ।।

गुरुजी....  आपल्या आयुष्याचे शिल्पकार..... आपल्या आयुष्याचा प्रकाश.... 
आपल्या आयुष्यातील अज्ञान दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवून आपले 
भवितव्य घडविणारे व्यक्ती. 

       ।। सासू - सासरे ।।

सासू - सासरे म्आहणजे जणू आपले आई - वडील. जन्म न देताही जीवनाच्या 
प्रत्येक पाऊलावर  आईवडीलांची अनुभूती देणारी स्नेहाची मूर्ती.... 
सासू - सासरे म्आहणजे जणू आपल्या आईवडिलांची प्रतिरूपेच
 

       ।। आत्या - मामा ।।

आई - वडिलकी च्या नात्याची ओळख करुन देणारे सौजन्यमूर्ती म्हणजे आत्या - मामा 
 

             ।। मामा ।।

मामा म्हणजे मानवीय जीवनाचे एक मनोरम नाते....
जेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा... आपल्या लग्नाचा विधीवत साक्षीदार....!
 

            ।। मामी ।।

मामी म्हणजे आपल्या आयुष्यात आपल्या मान सन्मानाची प्रारंभ कर्ती
बालपणात [ बाल्यावस्थेत ]  आपली आई सारखी सेवा करणारी....
 

             ।। दाजी ।।

दाजी म्हणजे  आपल्या आदर भावाचे शिखर.... आपले आदर्श....  आपले जीवन दर्शक...... 
 
   

            ।। साडु ।।

साडू चे नाते म्हणजे.... जरी  एकाच आईचे दूध नाही पिलेले नसलो तरी पण  
चिरतरुण बंधुत्वाची आपुलकी निर्माण करणारे एक अनोखे नाते. 
वडिलाच्या संपत्तीत वाटा न मागणारा भाऊ.
 

          ।। मेहुणी ।।

आपले आयुष्य खेळकर करणारी प्रेम सरिता..... आपले सासरचे वास्तव्य रमणीय 
करणारी एक हर्षवर्धिनी...
 

    ।। मावस भाऊ - बहीण ।।

बहीण भावाच्या नात्यातील आपुलकी.... ममतेचा बोनस.... बहीण भावाची उणीव 
भरुन काढणारे समर्थ पर्याय.
 

   ।। मेव्हणा भाऊ - बहीण ।।

नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी...... थट्टा मस्करीतून आपुलकी.... प्रेमाचा.... 
आविष्कार करणारे जीवलग.
 

         ।। भाचे - भाची ।।

आपल्या संस्कृतीचे भान देणारे स्नेहाचे ताट.... आपल्या दानशूरपणाचे शोभा वाढविणारे ठिकाण 
 

            ।। पुत्र ।।

भविष्याचा प्रकाश.... अस्तित्वाचा अर्थ.... वंशाचा कुलदीपक.... कुटुंबाचा उध्दारक....
म्हातारपणाची काठी.... जीवनाचा आधार.... आपले बालपण ज्याच्यात बघतो तो...
 

         ।। मुलगी ।।

पहाटेचे देव... वात्सल्याचे विरजण.... ममतेत खोट नसणारी स्नेह नंदिनी.....
पवित्र प्रीतीच प्रेममय झुळूक.... मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा.... 
जिची माया कधीच शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती.
 

         ।। नातवंडे ।।

 दुधावरची साय.... जीवनाच्या उतारावरील रमणीय बगिचा....
शेवट पर्यंत आयुष्याची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट....!
 

         ।। मित्र मैत्री ।।

भगवंताचे  वरदान... रक्ताच्या नात्यालाही लाजविणारे चिरंतन नाते.... 
विश्वासाची आधारशीला.... स्वतःचेच प्रतिरुप.
 

            ।। शेजार धर्म ।।

मानवी मूल्यांचा तीव्र रूप.... आपल्या संस्कृतीचा संधीप्रकाश..... आपल्या  सौख्याचा 
आलेख टिपणारी स्पंदने....!
 

           ।। शिष्य ।।

आपल्या कर्तृत्वाचा कळस आणि आपल्या कौशल्याची किरणे.....
 
खरोखर माणूस नाते जपतो का.....?
जो नाते जपतो तोच खरा माणूस...  
नात्यांना जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच.....! नाही का....?
 
मित्रांनो... नाते जपा..... नाते टिकवा........!
माणुस म्हणुन जगुया......
आयुष्यातील हे क्षण पुन्हा मिळणार नाही..........!
Post a Comment

0 Comments