वृक्षवल्ली आम्हां सगेसोयरे | मानवी पर्यावरण आणि वटपौर्णिमा

 वृक्षवल्ली आम्हां सगेसोयरे | मानवी पर्यावरण आणि वटपौर्णिमा

काल वटसावित्री म्हणजेच वटपौर्णिमा होती. एक प्रकारे महिलांचा आनंदाचा सण....
हा सण साजरा करीत असतांना एखाद्या ठिकाणी वडाच्या झाडाला गुंडाळलेल्या
धाग्याला आग लागली असेल किंवा कुणी मस्तीखोर ने लावली असेल... 

त्याचा विडीओ बनवून काही मागासलेल्या विचारांचे लोकं स्टेट्स ठेवतात कि.... 
आता सगळे नवरे मुक्त झाले....  आपल्या हिन्दू धर्मातील कांहीं चाली रीती आपण आजही खुप आनंदाने पाळतो. 
पण त्या मागचे ज्ञान लोकांना नसल्याने कांहीं जण कुचेष्टा कतात. घरात पाळले 
जाणारे सोवळे ओवळे पाहून अनेक जण नाक मुरडायचे. परंतु कोरोना आला. आणि 
सोवळे-ओवळे म्हणजे स्वच्छता.... हे ध्यानांत आल्यावर आम्ही ते मुकाटपणे सध्या पाळूं 
लागलोय....
वृक्षवल्ली-आम्हां-सगेसोयरे-मानवी-पर्यावरण-आणि-वटपौर्णिमा-vb-good-thoughts


काल वटसावित्री म्हणजेच वटपौर्णिमा झाली....! सुवासिनीने वडाला पुजून फेर्या 
माराल्या... झाडाची पूजा केली. परंतु या मागचे कारण माहित नसल्याने....
कुचेष्टेस उत्तर देता न आल्याने संकोच होऊन आपण मागासलेल्या विचाराचे आहोत
असे वाटून जाते.

मित्रांनो.... 
वडाचे झाड पाहिले कीं त्याचा होणारा विस्तार आपल्या लक्षात येतो. हे झाड फाद्यावर 
फुटणार्या पारंब्या रुजून वाढत राहते. या झाडाची पूजा सुवासिनीने करायची ते आपला 
वंश विस्तार तसा वाढावा म्हणून. परंतु पूजा करून वंश विस्तार कसा होणार....
याचे शास्त्रिय कारण या झाडापासून मिळणारे शुद्ध वायु हे आहे. याने आयुष्य वाढते.
 
पूजा करून फेर्या मारायच्या... त्या झाडाच्या वातावरणात कांहीं काळ घालवल्याने 
स्त्रिच्या उत्पत्ती शक्तीत सुधारणा होते. वंश वाढायला पुत्र हवा. ती शक्यता या वृक्षाच्या वातावरणाच्या सहवासाने वाढते. तेव्हां असा निसर्गोपचार करायला कमीपणा कसला...?
अशाच आणखी कांहीं वृक्षांची आपण पूजा करतो... त्यात उंबर आणि पिंपळ येतात.
वड - पिंपळ- उंबर या वृक्षात भगवंताचा वास असतो असे म्हणतात.

त्याचे कारण लोकांनी या झाडांना पाय लावूं नये म्हणून. पाय का नाहीं लावायचा....?
तर या वृक्षाची साल गुळगुळीत असते. या झाडांवर चढल्यास, घसरून पडण्याची शक्यता 
अधिक असते म्हणून...! लोकांनी हे ऐकावे यासाठी भगवंताचे अनुष्ठान या वृक्षांखाली 
वसवले गेले. यात आणखी एक विचार आहे कीं दर्शनाच्या निमित्ताने लोकांनी या वृक्षांच्या वातावरणात वावरावे.

आपण म्हणतो उंबराचे फुल दिसत नाहीं. परंतु या वृक्षाच्या वातावरणात वावरल्याने
न होणारे मुल होण्याची शक्यता वाढते. तेच माणसाच्या दृष्टीने उंबराचे फुल....!

पिंपळ वृक्षाच्या वातावरणातील वावर ज्ञान वाढवतो. आळंदीला ज्ञानेश्वर मंदिरातील 
वृक्षाला रुक्मिणी मातेने प्रदक्षिणा घातल्याने निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई एवढेच काय
गौतम बुद्धांना पिंपळवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले.
मंडळी या सहज लाभकारक बाबी आहेत. याला कोणताही खर्च नाहीं. 
झाला तर फायदाच आहे.

🙏

 

Post a Comment

0 Comments