जगणे हि महाग झाले आहे | बालपण | Childhood | सुंदर विचार

 जगणे हि महाग झाले आहे | बालपण | Childhood | सुंदर विचार 

मोठे झाल्यावर कळले की
खेळणी महाग नसतात...
बालपणच खूप महाग असतो....!

 
मला आठवीत आहे... आम्ही खूप मोठे होत पर्यंत लहानच होतो. तेव्हा सगळे काही 
स्वस्तच होते...बालपणही....!childhood-status-बालपण-स्टेट्स-सुंदर-विचार-विजय-भगत-लहानपणी-ची-आठवण


आपल्या बालपणात बालपणाला मनसोक्त उपभोग घेतला. कुठेही गेले तरीपण उन्हात.... 
पावसात.... मातीत.... नदीवर.... घराच्या समोरील आणि मागील दोन्ही अंगणात... 
गावाबाहेरील मोकळ्या जागेत... सर्वत्र बालपणरुपी हिरव्या गवताची चादर सगळीकडे 
पसरलेली राहत असे. परंतु आता तसे नाही आहे....!
 
आता तर मुले लहानपणातच  खूप मोठी होऊन जातात. भरपूर महाग झाले आहे बालपण...!

आई पूर्वी खूप स्वस्त होती..... ती पूर्ण वेळ आईच असायची...

लहानपणी सकाळ झाल्यावर झोपेतून उठवण्यापासून आंघोळ.... जेवण.... शाळा... खेळ... संध्याकाळी जेवण... झोपे पर्यंत... आईच होती... रागवायची... प्रेम करायची... मारायची... 
भीती दाखवून जेवायला लावायची.... पूर्ण वेळ आईच असायची.... सगळीकडे आईच 
दिसायची. ही आई आता मम्मी झाली आहे... आणि मम्मी खूप महाग आहे...! 
मम्मी जॉब करते... सकाळी लवकर उठून घाईघाईने कामे आवरून जॉब वर जाते. 
पूर्ण वेळ मम्मी फक्त रविवारलाच उपलब्ध असते...!
 
मामा – मावशीचे गाव आता राहिले नाहीत...! प्रेमळ मामा – मामी, मावशी – मावशा,
आत्या –  मामा आता पूर्वीसारखी नाते राहिले नाहीत.... पूर्वी सगळे आपली वाट 
पाहायचीच...

आता सगळ्यांना कुणीही नकोसे झाले आहे....! हा सगळा परिस्थितीचा दोष आहे.
तेव्हा बालपणाच्या सोबतच मित्र हि खूप स्वस्त होते....! आपल्या हाताची दोन बोटे 
त्याच्या हाताच्या बोटांवर टेकवून साधे बट्टी म्हटले की नेहमीची मित्रता होत असे.
 
शाळेच्या निळ्या हाफ पेंट मध्ये खोचलेला पांढरा शर्ट बाहेर काढून त्यात संत्रा गोळी 
गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी...!
आताच्या मुलांना तर आधीच घरून सूचना असते.... 
बेटा डोंट शेअर युअर टिफिन कळले...! 
आता मित्रता खूपच महाग झालेली आहे.

childhood-status-बालपण-स्टेट्स-सुंदर-विचार-विजय-भगत-लहानपणी-ची-आठवण

ते दिवस म्हणजे हेल्थला आरोग्य म्हणायचे दिवस होते....! सायकलचा एक जुना 
फाटकासा टायर आणि बांबूची एक दीड हात काठी इतक्याच भांडवलावर संपूर्ण गावाला 
धावत फेरी घालतांना तबियत अगदी स्वस्तात मस्त होऊन जायची....!

जुन्या कापडाने घट्ट बांधून बनवलेल्या कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळत असतांना आपली 
पाठ स्वस्तात इतकी मजबूत झालेली आहे की... आयुष्यात कशीही परिस्थिती आली तरी 
कधी ही पाठ वाकली नाही...! आणि आता इम्युनिटी बूस्टर औषधी भरपूर महाग झालेली 
\आहेत असे म्हणतात....!

पूर्वी ज्ञान.... शिक्षण.... पुस्तके.... इत्यादी किती स्वस्त होते.
केवळ वरच्या वर्गातल्या मुलाशी बोलनी करून ठेवून.... द्वितीय संत्रान परिक्षा झाली की 
त्याची पुस्तके अर्ध्या किंमतीत मिळून जात असत. आणि जुन्या वह्यांची उरलेली 
कोरी पाने काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची.

आता मात्र पाटीची जागा फोन ने घेतली आहे...
आज ऑनलाईन शिक्षण परवडणारे झालेले आहे.

इतकेच काय.... मित्रांनो.... 
कालपरवा पर्यंत तर मरण ही तरी स्वस्त होते....
परंतु आता तर मरण ही पाच - सात लाखांचे बिल झाल्याशिवाय 
येईनासे झाले आहे....!
म्हणून म्हणत आहे.... जोवर आहोत तोवर आठवत रहायचे....
नाहीतर आठवणीत ठेवायला ही कुणीही नसणार....!

 

Post a Comment

0 Comments