Best Thank You for Birthday In Marathi | वाढदिवस आभार संदेश | धन्यवाद

Best Thank You for Birthday In Marathi | वाढदिवस आभार संदेश | धन्यवाद 

 सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद....

तसे पहिले तर आपल्या माणसांचा आभार प्रकट करणे.... त्यांना धन्यवाद करणे.... 
म्हणजे जणुं परके केल्यासारखे वाटते. परंतु भावना व्यक्त करण्यासाठी 
कधी- कधी दुसरा पर्यायच नसतो...!

Best-Thank-You-for-Birthday-In-Marathi-वाढदिवस-आभार-संदेश-धन्यवाद-vb-good-thoughts-happy-birthday-wishes

🎂 वाढदिवस आभार संदेश 🎂

खरे पहिले तर आज माझा वाढदिवस मुळात नव्हताच.... 
जे होते ते तुमचे वात्सल्य.... आपुलपणा.... माझी काळजी.... सदिच्छा.... 
तुमचा आशिर्वाद आणि आजपर्यंत 
मिळालेली तुमची अतुट अशी सर्वांची खंबीर साथ.  
अशा पवित्र भावनांचा हा एक सोहळा होता माझ्यासाठी.

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सर्वच क्षेत्रातील लहान.... थोर.... मोठ्यांनी  दिलेल्या
अमुल्य शुभेच्छां आणि अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो.
आणि सोबतच गेल्या वर्षभरात माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील... 
माझ्या अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल मी हाथ जोडूनी
क्षमा मागतो.

आपला स्नेह.... प्रेम.... आणि आशिर्वाद असाच माझ्यावर नेहमी राहु असू द्या...!
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार.... धन्यवाद......

💖🌹🙏🙏🙏💖🌹

आभार

वाढदिवशी किती वय वाढले...
यापेक्षा किती नवीन माणसे
जोडली गेली हे महत्वाचे....
आज लक्षात आले
माझ्या जीवनातील माणसाची गणना 
अगणित आहे. आभार
आपण सर्वांचे मनपूर्वक आभार...!
धन्यवाद....

💖🌹🙏🙏🙏💖🌹

Best-Thank-You-for-Birthday-In-Marathi-वाढदिवस-आभार-संदेश-धन्यवाद-vb-good-thoughts-happy-birthday-wishes-जन्मदिवस


 काल माझा वाढदिवस होता. हा वाढदिवस तुम्हा सगळ्यांच्या 
असंख्य शुभेच्छा आणि आशीर्वादाने अविस्मरणीय झाला आहे. 
माझ्यावर असेच प्रेम करीत रहा. आशिर्वाद देत रहा. 

तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी शक्ती आहे. 
मी व्यक्तीश: प्रत्येकाला धन्यवाद देण्याच्या पूर्ण प्रयत्न केला 
परंतु तरीही काहींचे आभार मानायचे राहिले असतील तर माफ करा. 

💖🌹🙏🙏🙏💖🌹

 

 प्रथम सर्वांचे मनापासून आभार.... खूप खूप धन्यवाद
काल माझ्या वाढदिवसा निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रातील..... 
जसे राजकीय.... शैक्षणिक..... सामाजिक....  माझे वडीलधारी 
आणि मित्र परिवार.... आपण सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी 
शुभेच्छांचा मी हृदयातून स्वीकार करतो.

शुभेच्छांचा वर्षाव इतका होता की.... कुणाचेही वैयक्तिक आभार ही 
करता आले नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.

जर कुणी विचारले.... तू काय कमावले...? 
तर मी अगदी अभिमानाने सांगू शकेल की...
तुमच्या सारखे जिवा भावांची माणसे कमविली आहे.
मनापासून आभार

💖🌹🙏🙏🙏💖🌹

आजच्या या धावपळीच्या काळात 
आपण मला आठवणीने वाढदिवसाच्या 
शुभेच्छा दिल्या.   
आपले प्रेम.... आपुलकी... आशिर्वाद... 
असेच नेहमी सोबत राहु द्या. 
आपल्या सर्वाचे मनापासून आभार

💖🌹🙏🙏🙏💖🌹

 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय 🚩

आभार....

आपन सर्वांनी माझ्या वाढदिवसा निमित्ताने 
शुभेच्छा दिली....
आपले प्रेम आणि आशीर्वाद दिलेत...
 आपणा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.

💖🌹🙏🙏🙏💖🌹

आभार

आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझा आनंद द्विगुणित झाला.
आपण वेळात वेळ काढून
मला शुभेच्छा दिल्याबद्दल
मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात
माझ्या पाठीशी उभे रहा.
 धन्यवाद.

💖🌹🙏🙏🙏💖🌹Best-Thank-You-for-Birthday-In-Marathi-वाढदिवस-आभार-संदेश-धन्यवाद-vb-good-thoughts-happy-birthday-wishes-जन्मदिवस-विजय-भगत

 🙏आभार🙏

 काल माझा वाढदिवस झाला अनेकांनी प्रत्यक्ष भेटून... 
फोन करून... टेक्स्ट मॅसेज करून... व्हॉट्सअप... फेसबूक.... 
सोशल मिडीया.... च्या द्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आशिर्वादही दिला. त्या सर्वांचा मी आभारी खूप खूप आहे...!

असेच सगळ्यांचे प्रेम... सहकार्य.... आशिर्वाद.... शुभेच्छा....
नेहमी माझ्यावर ठेवा... हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पुनः एकदा धन्यवाद...

💖🌹🙏🙏🙏💖🌹

मी आपला खुप खुप आभारी आहे.
आपण कितीही व्यस्त असलात... 
तरीही तुम्ही वेळात वेळ काढून 
मला शुभेच्छा संदेश पाठविले.
खूप आनंद झाला... आणि 
खूपच सुखावलो....!

तुमच्या प्रेमाचा.... आशीर्वादाचा हात 
असाच घट्ट राहू दया. मैत्री.... 
आपुलकी आणि विश्वास असाच कायम राहु द्या. 
ज्यामुळे माझी नवी वाट शोधतांना 
मला एकटेपणा जाणवणार नाही.
तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे....!
           🍁🙏🏼

💖🌹🙏🙏🙏💖🌹

 🎂💐🎂 आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..🎂💐🎂

मानवीय आयुष्यात जेवढी किंमत 
पैसा आणि मेहनत ची आहे...
तितकीच किंमत ही वेळेचीही आहेच.... 
असे मला वाटते.

आपण आपल्या जीवनातला असा 
अमूल्य वेळ काढून मला फोन करून...
टेक्स्ट मॅसेज करून... व्हाट्सअप.... 
फेसबुक... इत्यादी सोशल मिडीयाच्या
माध्यमातून तसेच स्वतः भेटून 
दिवसभर माझ्या वाढदिवसानिमित्त
ज्या शुभेच्छ्या दिल्या... 
त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे.

तसेच खूप जणांनी मनोमन दिलेल्या 
शुभेच्छांचाही मी स्वीकार करतो...
तसेच ईच्छा असतांनाही वेळे अभावी 
शुभेच्छा नाही देऊ शकलेल्या 
माझ्या सर्व स्नेहीजणांचाही मी आभारी आहे.

आपण दिलेल्या ह्या शुभेच्छांच्या जोरावर 
मी माझ्या पुढील जीवनात गरूडझेप घेईल...
यात काही शंका नाही...!

आपले हे प्रेमच जीवनाचा मूळ भाग असलेल्या 
देव... देश.... धर्म.... अर्थात थ्री डी च्या संकल्पना 
माझ्या जीवनात आणखीनच ठाम होतील.

यापुढील जीवनात आपले प्रेम आणि सोबत 
अशीच नेहमी रहावी... 
अशी देवाकडे प्रार्थना करतो.
खूप खूप धन्यवाद..... आभार....      

💖🌹🙏🙏🙏💖🌹

 छत्रपती शिवरायांच्या पावन भुमीत 
माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे.

ज्या महाराष्ट्रात मराठी अस्मितेची ज्योत पेटवत ठेऊन 
शिवरायांनी पवित्र भगवा ध्वज फडकवला...  
अश्या या महाराष्ट्रात माझा जन्म झाला... 
याला मीआपली पुण्यायीच समजतो.

येथे तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे 
सोन्याहून पिव झाल्यासारखे आहे.
तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे... 
मी नशीबवान आहे... असे म्हणावे लागेल.

मला या वाढदिवसासाठी तुम्ही नेहमी प्रमाणे 
शुभेच्छांचा वर्षाव करत माझा वाढदिवस 
पुन्हा एकदा अविस्मरणीय बनविला... 
त्यासाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे.

आपले प्रेम आणि आशीर्वाद असाच 
माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो.
आपण दिलेल्या शुभेच्छा रुपी आशिर्वादाचा 
मी कायम ऋणी राहील.

आपले प्रेम नेहमी असेच राहु द्या.... 
आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून
स्वीकार करतो. आपले मनःपूर्वक धन्यवाद... 
आभार…!

असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा 
मनापासून मी आपला आभारी  आहे

💖🌹🙏🙏🙏💖🌹

💖🌹🙏🙏🙏💖🌹

माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने 
आपण आठवणीने स्नेहपूर्वक
शुभेच्छांचा वर्षाव केलात... 
त्याबद्दल मी आपला 
खूप  खूप  आभारी आहे.

🙏 धन्यवाद  🙏

💖🌹🙏🙏🙏💖🌹

वाढदिवस हा फक्त एक निमित्त.... 
खरेतर या निमित्ताने अमुल्य क्षण आठवतात...
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो 
आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे...
जगण्याच्या लढाईला शक्ती मिळते.

माझा जन्मदिवस अविस्मरणीय केला.... 
आपले मनःपूर्वक आभार....

माझ्या आजवरच्या वाटचालीत 
आपल्यासारख्या हितचिंतकांच्या 
शुभेच्या आणि स्नेह यांचा बहुमोल वाटा आहे. 

आपल्या शुभेच्छा मी हाती घेतलेल्या कार्यात 
मला निश्चितच मनोबल वाढविणाऱ्या
आणि प्रेरणादायी ठरणार आहेत. 
यापुढेही आपला स्नेह असाच
यापुढेही आपला स्नेह असाच वाढत राहो.... 

आभार.... धन्यवाद........

💖🌹🙏🙏🙏💖🌹 

आभार

माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या
शुभेच्छा रुपी स्नेह
व्यक्त केल्या बद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद.

💖🌹🙏🙏🙏💖🌹 
 

Post a Comment

0 Comments