मराठी सुविचार संग्रह | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi On Life With Images

 मराठी सुविचार संग्रह | सुंदर विचार | Good Thoughts In Marathi On Life With Images

हात जोडणारा व्यक्ति 
स्वार्थाशिवाय जवळ येत नाही. 
आणि पाय ओढणारा व्यक्ति 
तुमचे कधीही चांगले बघत नाही. 
तेव्हा अशा व्यक्तिंना  
दुरूनच नमस्कार केलेला बरा...!
🙋🌹🙏


 
good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-स्वार्थ

प्रेम करणे वाईट नसते. 
परंतु ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता 
त्यांना हृदय नसणे हे खुप वाईट असते.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-प्रेम

काही गोष्टी तुम्हाला 
परमेश्वराला मागून मिळत नाही.  
तुम्हाला ते मिळवण्यासाठी 
कष्ट करावे लागतात...!
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-परमेश्वर-कष्ट

काय करायचे हे ठरवले की 
कसे करायचे 
याच्या मार्ग सापडतोच...!
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-मार्ग-सापडतोच

 लक्षात ठेवा... 
काही वादळ 
विचलित करण्यासाठी नाही... 
तर पुढचा रस्ता 
मोकळा करण्यासाठी येत असतात.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-वादळ

कठीण परिस्थिती 
हीच सर्वोत्तम प्रतिभेचे 
निर्मिती स्थान असते.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-कठीण


तुमच्या श्रीमंतीला पाहून जवळ येणारे
... 
त्यांच्या गरजांसाठी... 
तुमच्या श्रीमंतीचा वापर करून घेणारे असतील. 
परंतु गरिबी ला पाहून जे जवळ आलेत.... 
ते पूर्ण रुपी माणुसकीने आलेत. 
त्यांच्यावर कधी संशय घेऊ नका.
🙋🌹🙏
good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-श्रीमंत

आयुष्यात सत्य 
नेहमी पडताळून पहा. 
कारण कधीकधी 
आपले डोळे सुद्धा धोका देतात.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन
 
हरलात तरी चालेल. 
परंतु खेळतांना जिंकणार्‍याला 
घाम फुटला पाहिजे असे खेळायचे.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन -जिंकणे

 
तुम्हाला धन्यवाद म्हणणाऱ्या लोकांची संख्या 
तुम्ही जितकी वाढवाल.... 
तितके तुम्ही जास्त यशस्वी होत जाल...!
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-सुविचार-फोटो
 
आव्हानांना बंधने घालू नका. 
बंधनांना आव्हान द्या.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-आव्हान-बंधने

मदत करणाऱ्याला 
कधीही धोका देऊ नका. 
आणि धोका देणाऱ्याला 
कधीही मदत करू नका.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-मदत
 
प्रति आव्हान द्यायला शिकले पाहिजे. 
जो पर्यंत तुम्ही तो देत नाही.... 
तो पर्यंत तुम्ही सत्य असूनही 
तुम्हाला अन्याय सहन करावा लागतो.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-आव्हान

आयुष्यात काही माणसांना 
आपण गमावणार तर काही माणसे 
आपल्याला मिळणार... 
आपण फक्त जगण्याचा उत्साह गमवायचा नाही.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-गमावणार

फळा खडू आणि डस्टर आपले मार्गदर्शक आहेत. 
फळा हा मोठ्या मनाचा प्रतिक आहे. 
खडू मोठ्या विचारांचा प्रतीक आहे. 
आणि डस्टर मोठ्या आचरणाचा प्रतीक आहे.
आपल्या वाट्याला जे काही आले... 
ते मोठ्या मनाने स्वीकारा. 
नेहमी चांगले विचार ठेवा. 
आणि झालेल्या चुका पूसत 
योग्य आचरण करा.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-आव्हान-फळा-खडू-डस्टर
 
जीवनात खूप माणसे भेटतात... 
वार्‍याच्या झुळके प्रमाणे येतात... 
आणि जातात परंतु काही माणसे 
अशी असतात... जी मनात जागा घेतात.... 
हीच गोड माणसे आयुष्याचा अर्थ सांगतात.... 
ओठांवर हास्य खुलवतात आणि अश्रू ही पुसतात. 
कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात 
तर कधी मध्येच भावनिक होतात. 
परंतु तीच माणसे अशी असतात 
जी या दुनियेत आपली असतात.
🙋🌹🙏
 
शांत राहून 
निरीक्षण करायला शिका.
प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे 
गरजेचे नसते.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-आव्हान-positive-thoughts
 
काही वेळा आपली चूक नसतानाही 
शांत बसणे योग्य असते. कारण 
जो पर्यंत समोरच्याचा मन मोकळा होत नाही 
तो पर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-आव्हान-चूक

विचार पॉझिटिव ठेवा. 
रिपोर्ट पॉजिटिव आल्याने 
जीवन संपत नसते.
🙋🌹🙏

good-thoughts-in-marathi-on-life-sunder-vichar-suvichar-status-vb-vijay-bhagat-आयुष्य-जीवन-आव्हान-positive-thoughts 

जीवन जगण्याचे सोपे गणित.... 

जिथे आपला मान नाही तिथे कधीही जायचे नाही. 
जे आपल्याला पचत नाही ते कधीही खायचे नाही. 
ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो... 
त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. 
जे एकदा नजरेतुन उतरले... 
त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. 
वेळ पाहून बदलतो त्याला मित्र बनवायचे नाही 
आणि कितीही संकटे आली तरी कोणालाही घाबरायचे नाही.
🙋🌹🙏
 
गैरसमजाचा एक क्षण 
इतका विषारी असतो की 
तो प्रेमाचे शंभर क्षण 
एका क्षणात विसरतो.
🙋🌹🙏
 
आयुष्याच्या तराजूत 
अनुभवाचे वजन नेहमी जास्त असते.
🙋🌹🙏
 
आज-काल कोणत्याही ऋतूमध्ये 
आभाळ भरून येऊ लागले 
माणसावरचे संकट पाहून 
जणू सृष्टीलाही गहिवरून येऊ लागले.
🙋🌹🙏

माणसाची समस्या त्या माणसाला जितका त्रास देत नाही..... 
त्यापेक्षा जास्त माणसाचे मन त्या माणसाला त्रास देत असते. 
नको ते विचार मनात आणून त्या माणसाच्या मनात भीतीचे वातावरण 
निर्माण करून ठेवत असते. त्यामुळेच माणूस दिवसेंदिवस खचत असतो. 
आणि त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग ही शोधत असतो. परंतु 
त्या वेळेस त्या माणसाला त्याचे मन त्याला चुकीच्या मार्गावर नेत असते. 
आणि एका समस्येतून दुसऱ्या समस्येत अडविण्याच्या काम आपलेच मन 
करत असते. त्यामुळे जेव्हा जीवनात अशी परिस्थिती निर्माण होईल तेव्हा 
आपल्या मनाने शोधून दिलेल्या मार्गावर चुकूनही जायचे नसते,  
तर चांगल्या मार्गदर्शकाकडून सल्ला घ्यायचा असतो किंवा 
काही काळ केवळ शांत राहायचे असते.
 
सुख इथेच असतो.... जसजसे वय वाढत जाते सुखाचा काळ ओसरत जातो.
🙋🌹🙏Post a Comment

0 Comments