कोरोना एका कोरोना रुग्णाला सुचलेली समर्पक कविता | सुंदर मराठी कविता

कोरोना  | एका कोरोना रुग्णाला सुचलेली समर्पक कविता | सुंदर मराठी कविता

corona-covid-19-marathi-poem-sunder-vichar-vb-good-thought-vijay-bhagat


सतत 10 दिवस कोव्हिड सेंटर मध्ये  राहत असतांना 
एका कोव्हिड असलेल्या रुग्णाला  सुचलेली
एक समर्पक कविता.
 

            कोरोना 

चांगले झाले भगवंता की मला कोरोना झाला
जीवनाचा आलेला सगळा माज निघुन गेला.
मी नेहमीच म्हणत असे.... माझी गाडी आणि माझा घर
पण जेव्हा एम्बुलेंस मध्ये बसलो संपुर्ण जीव उशाला टांगला
रुग्णवाहिका थांबली घरा समोर आणि रस्ता दिसेनासा झाला
 चांगले झाले भगवंता की मला कोरोना झाला
 
येणाऱ्या प्रत्येक खोकल्याच्या सोबत उलट - सुलट केलेली कर्म आठवत होती.
अडकणाऱ्या प्रत्येक श्वासा सोबत माणुसकीची जान साठवत होती.
पुण्यसंचय संपत आला आणि ऑक्सीजन चा तुटवडा झाला
तेंव्हा कुठे भगवंत तुझ्यावर विश्वास बसायला लागला
चांगले झाले भगवंता की मला कोरोना झाला
 
  पैशांची मस्ती होती.... आणि पदाची ही गरमी होती
 सगळे आता संपले  भगवंता... आली आहे पूर्ण नरमी
आता जेव्हाचा मिळालेला आहे गरीबाच्या शेजारी खाट...
तेव्हाचा आता माझा जिरला आहे सगळाच थाट
 सगळे आठवून आठवून  आता जीव ही घाबरायला लागला  
चांगले झाले भगवंता की मला कोरोना झाला
 
आयुष्यात कधी नाही दिली कुण्याही गरिबाला एकही दमडी...
इथे सुई टोचून टोचून सुजून गेली आहे चमडी.
 पैसा पैसा करीत कमावलेला पैसा आज कामी नाही आला
  चांगले झाले भगवंता की मला कोरोना झाला.
 
  खरे सांगतो... मित्रांनो आता... पैसा...पद आणि खोटी प्रतिष्ठा
यात काही दम नाही.
कोरोनाच्या बेडवर केवळ प्रेमाचे व्हेंटीलेटरच कामी येईल...
नात्यांमधील ऑक्सिजन कधी कमी होऊ देऊ नका
मैत्रीच्या ऑक्सिमिटर मधले बोट कधी सोडवु नका.
Post a Comment

0 Comments