Best Quotes In Marathi On Life || आयुष्यातील चांगले विचार || Good Thoughts In Marathi On Life

 Best Quotes In Marathi On Life || आयुष्यातील चांगले विचार || Good Thoughts In Marathi On Life

Best Quotes In Marathi On Life - आयुष्यातील चांगले विचार - Good Thoughts In Marathi On Life-vb-good-thoughts-suvichar-vijay-bhagat
Best Quotes In Marathi On Life - आयुष्यातील चांगले विचार 

Marathi Suvichar || Sunder Vichar 


घुसमट झाली की श्वास गुदमरतो..... 
आणि वैचारिक घुसमट झाली की 
जीव गुदमरतो
🥀💮🌺🌼
 
आनंदाचे क्षण 
आपल्या आजूबाजूलाच असतात... 
फक्त गरज असते... 
त्यांना डोळसपणे बघायला शिकण्याची...!
🥀💮🌺🌼

 

जरी ध्येयाकडे जाण्याचा वेग 
कमी पडला तरी चालेल... 
फक्त थांबू नका...
🥀💮🌺🌼

 

डोळ्यांचा नेहमी स्वतःवर विश्वास असतो... 
दोन बोटा इतके अंतर असणारे कान मात्र 
दुसऱ्यावर विश्वास ठेवतात.
🥀💮🌺🌼


अहंकाराने आंधळा झालेल्या माणसाला 
ना आपल्यातले दुर्गुण दिसतात   
ना दुसऱ्या माणसातील चांगल्या गोष्टी.
🥀💮🌺🌼

आनंदाचे क्षण आपल्या आजूबाजूलाच असतात || मराठी प्रेरणादायक सुविचार
 
सुंदर असणे आवश्यक नसते
परंतु कुणासाठी आवश्यक असणे.... 
खूप सुंदर आहे.
🥀💮🌺🌼
 
साधारण असणे 
हे किती असाधारण आहे... 
हे कळले की... 
बरेच से मोठे प्रश्न अवैध होतात....!
🥀💮🌺🌼

 

जर एकदा का 
मन मारून जगण्याची सवय झाली 
तर हळूहळू तुमच्या सगळ्या भावनाही 
नाहीसा होऊन जातात...!
🥀💮🌺🌼

 

एका व्यक्तीच्या मनात जागा बनविणे 
आणि ती जीवनभर टिकवून ठेवणे... 
हे खूप कठीण कार्य असते...!
🥀💮🌺🌼


काही लोकांना वाटते की...
आपल्या शिवाय याचे काहीच होणार नाही... 
पण लक्षात ठेवा... 
सूर्य बुडतांना दिसतो 
परंतु तो कधीही बुडत नाही...!
🥀💮🌺🌼

एका व्यक्तीच्या मनात जागा बनविणे || मराठी प्रेरणादायक सुविचार || Suvichar status Marathi
 

माणूस नेहमी ईश्वरासमोर भिकारी 
आणि भिकाऱ्या समोर ईश्वर 
असल्याचा देखावा करतो...!
🥀💮🌺🌼

 

असलेल्या गोष्टीत रमता आले की 
नसलेल्या गोष्टीची हुरहूर लागत नाही...!
🥀💮🌺🌼


प्रत्येक माणूस परिस्थितीमुळे शांत बसतो 
आणि सहन करतो तुमचे बोलणे...
नाहीतर कोण ऐकणार आणि सहन करणार 
तुमचे काहीही बोलणे आणि कसेही वागणे...!
🥀💮🌺🌼
 
भावनांचा आणि वेदनांचा 
कधीही हिशोब लावता येत नाही... 
त्या ज्याच्या असतात 
फक्त त्यालाच कळतात.
🥀💮🌺🌼


जीवनाला कसे जगायचे 
हे आपल्या हातात असते. 
मग त्यात अडचण असो 
अन्यथा दुसरे काहीही असो.... 
जर तुम्ही ठरवले कि 
मला असेच जगायचे आहे....
तर तुम्ही तसे जगू सकता... 
सुंदर जीवन म्हणजे केवळ पैसा पाहिजे 
असे काही नसते...
सुख समाधान असले ना 
तरीही जीवन सुंदर होऊन जाते.
🥀💮🌺🌼

 

प्रत्येक माणूस परीस्थिती मुळे शांत बसतो | मराठी प्रेरणादायक सुविचार || Good Thoughts in marathi


माणसाने जीवन एकदम सुखाने जगावे... 
आपल्याबरोबर काल काय घडले 
याचा विचार करण्यापेक्षा... 
उद्या आपल्याला काय घडवायचे आहे...
याचा विचार करा. कारण 
आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही 
तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला 
जन्माला आलो आहे.....!
🥀💮🌺🌼

 

भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा 
थोडेसे समजून घेतलेले काय वाईट...?
🥀💮🌺🌼

 

जाणारा तुमच्या चुका आणि कमीपणा बघतोय...  
सोबत राहणारा तुमचा स्वभाव आणि माणुसकी....!
🥀💮🌺🌼

 

निसर्गातील वादळापेक्षा 
मनातील वादळे 
भयानक असतात...!
🥀💮🌺🌼


जो तुम्हाला मान देवून 
सोबत घेऊन जाईल... 
जीवनात त्याचाच मान राखा... 
कारण या जगात मान देऊन कान भरणारे... 
आणि तोंडावर तर गोड गोड बोलणारे 
आणि पाठीमागे वाईट बोलणारे भरपूर आहेत.
🥀💮🌺🌼

निसर्गातील वादळापेक्षा मनांतील वादळे भयानक असतात. || Good thoughts in marathi on life || सुविचार


Post a Comment

0 Comments