बोधकथा - बुद्धी - Good Thoughts In Marathi - Marathi Moral Story [9]

बोधकथा - बुद्धी - Good Thoughts In Marathi - Marathi Moral Story - vb-good-thoughts-vijay-bhagat-marathi-story-beach-evening-sun-rise
बोधकथा - बुद्धी - Good Thoughts In Marathi - Marathi Moral Story

बोधकथा - बुद्धी - Good Thoughts In Marathi - Marathi Moral Story [9]

एक योगी श्री रामकृष्ण परामहंस यांना भेटला आणि म्हणाला....
महाराज... मी पाण्यावरून चालत जाऊ शकतो... समोर जी नदी आहे... 
या नदीच्या पाण्यावर चालत जाऊन... मी त्या काठावर सहजच पोहचू शकतो...!

रामकृष्ण परमहंस म्हणाले.... हो का...?
तो सिद्ध योगी म्हणाला..... हो महाराज... परंतु हे साध्य करण्यासाठी मी पूर्ण
चौदा वर्षा पर्यंत कठोर तप आणि साधना केली आहे...!

त्या योगी ने असे सागितल्यावर रामकृष्ण परमहंस म्हणाले....  
हा पाण्यावर चालण्याचा  चमत्कार तर फक्त आठ आण्यांत हि होऊ शकतो.

  योगी आश्चर्याने विचारतो... कोण करतो....?
 रामकृष्ण जी म्हणाले.... या नदीवर एक नाव चालविणारा नाविक आहे. तो फक्त
आठ आण्यांत कोणालाही या पाण्यावरून दुसऱ्या काठावर पोहोचवितो.

 तात्पर्य :चमत्कारापेक्षा तुलनात्मक बुद्धी महत्वाची असते...!

एक किलो तूप - मराठी बोधकथा
Post a Comment

0 Comments