बोधकथा - व्यर्थ चा अभिमान नको...! - Moral Story In Marathi [14]

बोधकथा - व्यर्थ चा अभिमान नको...! - Moral Story In Marathi

बोधकथा-व्यर्थचा-अभिमान-नको-Moral-Story-In-Marathi-good-thoughts-in-marathi-on-life-vb-good-thoughts
बोधकथा-व्यर्थचा-अभिमान-नको-Moral-Story-In-Marathi-good


एका गावात एक म्हातारी होती आणि त्या म्हातारीला नेहमीच असे वाटत असे कि 
तिच्या जवळ असलेला कोंबडा दररोज सकाळी आरवतो म्हणूनच या गावात 
सूर्य उगवतो आणि इथे सकाळ होते... 
ही गोष्ट ती गावात ही मोठया अभिमानाने सांगत असे आणि गावकरी तिला वेडी समजत...! 
जे सज्जन व्यक्ती होते ते म्हातारीला वेडी समजून दुर्लक्ष करीत पण काही कारटे तिला त्रास 
देत असत... हळूहळू त्रास देणाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि आता ते म्हातारीला सहन होत नव्हतेच... म्हणून तिने आता गाव सोडण्याचा निर्णय घेतला.

म्हातारीने रात्रीच्या वेळी गावं सोडला आणि आपला कोंबडा सोबतच घेतला आणि
म्हातारी दुसऱ्या गावी जायला निघाली.... तिने विचार केला की... मी या गावातून
दुसऱ्या गावी रात्रीला निघतो ज्यामुळे कोंबडा या गावात आरवणार नाही... 
त्यामुळे या गावात सूर्य निघणारच नाही... मग सगळे गावकरी बोंबलायला लागतील...
तेव्हा त्यांना समजेल की म्हातारीला त्रास देण्याचे काय परिणाम होतात...!
मग मला शोधत फिरतील... आणि रडत बसतील...!
म्हातारी दुसऱ्या गावात गेली.  जाता जाता दुसरा दिवस ही उजाडला... 
तिचा कोंबडा ही आरवला. ती ज्या गावात गेली होती... त्या गावात सूर्य ही उगवला होता. 
त्या सूर्य पाहून ती म्हातारी म्हणाली...  हा इथे सूर्य उगवला आहे... 
आता माझ्या जुन्या गावात कुठला सूर्य उगवणार...? सारे गावकरी रडत बसले असतील... 
मला छळता काय...आता भोगा आता आपल्या कर्माची फळे...
आणि म्हातारी जोरात हसायला लागली...

आपण त्या गावकऱ्यांची कशी जीरवली याचा तिला अभिमान वाटायला लागला...

परंतु... तिला माहीत नव्हते की त्या तीच्या जुन्या गावात आज सूर्य उगवला होता.

 

     तात्पर्य :-  हे जग आपल्यामुळेच चालते....
                      असा व्यर्थचा अभिमान कधीही बाळगू नये.


मराठी बोधकथा - निर्णय क्षमता - Marathi Moral Story [१]


विचार...! - मराठी बोधकथा - Moral Story In Marathi - सुंदर विचार [ २ ]


अतिथी धर्म – मराठी बोधकथा - Moral Story In Marathi [३]


मराठी बोधकथा - व्यंग - Good Thoughts In Marathi On Life [4]


मराठी बोधकथा - मोठेपण - Good Thoughts In Marathi On Life [5]


मराठी बोधकथा - भांडण - Good Thoughts In Marathi On Life [6]


बोधकथा - स्वभाव आणि छंद - Good Thoughts In Marathi On Life [7]


बोधकथा - एकी - Good Thoughts In Marathi On Life - Sunder Vichar [8]


बोधकथा - बुद्धी - Good Thoughts In Marathi - Marathi Moral Story [9]


बोधकथा - असत्य...! - Good Thoughts In Marathi on Life [10]


बोधकथा – नानकजी चा आशीर्वाद - Good Thoughts In Marathi On Life [11]


बोधकथा -  कर्तृत्वाचा गर्व - Moral Story - Good Thoughts In Marathi On Life [12]


बोधकथा - मातृभाषा आणि संस्कार - Moral Story In Marathi [13]

Post a Comment

0 Comments