मराठी बोधकथा - व्यंग - Good Thoughts In Marathi On Life [4]

 

मराठी बोधकथा - व्यंग - Good Thoughts In Marathi On Life-vb-good-thoughts-sunder-vichar-vijay-bhagat-maratho-story
मराठी बोधकथा - व्यंग - Good Thoughts In Marathi On Life

 मराठी बोधकथा - व्यंग - Good Thoughts In Marathi On Life

कसलीही चेष्टा करावी. परंतु.... ती फक्त गंमत किंवा मस्करी म्हणूनच...

एखाद्याच्या व्यंगावर चेष्टा करणे किंवा त्या व्यंगाचा उल्लेख करून
चारचौघांत त्याचा अपमान करणे हे चुकीचे असते... 
ते सभ्यतेचे लक्षण तर नाहीच.
तरीपण जर एखाद्याने असे केलेच तर ती चेष्टा आपल्यावर उलटूही शकते...!

याचे नेहमी भान ठेवावे. आपला विशाल एकदा रस्त्यावरून ऐटीत चालला होता
तेवढ्यातच समोरून रजनी येतांना दिसली. ती थोडीशी एका डोळ्याने तिरळी होती. 
विशालचा स्वभाव मुळातच कडूहोता... त्यात थोडे तिरळे बघणारी रजनी समोरून 
आलेली पाहून विशाल म्हणाला... काय रजनी...! कसे काय... 
सगळे ठीक आहे ना...कुठे चालली आहेस...? आणि हो... तुला एका वस्तूच्या 
दोन वस्तू दिसतात असे म्हणतात.... खरे आहे का...? 

रजनीच्या लक्षात आले की... विशाल आपली चेष्टा करीत आहे...! 
हा आपल्याला हिणवत आहे...! सगळे लक्षात येताच रजनी म्हणाली....

हो रे आहे हे...! आता तू हेच बघ ना... तुला तर दोन पाय आहेत ना....?
परंतु मला ना... तुला चार पाय असल्याचे दिसत आहे...!

तात्पर्य : कधीही दुसऱ्याच्या व्यंगाला हसू नये.
तसेच त्याचा उपहासही करू नये.

Post a Comment

0 Comments