भावांमधील नाते - Good Thoughts In Marathi - Sunder Vichar - सुंदर विचार

भावांमधील नाते - Good Thoughts In Marathi - 

Sunder Vichar - Marathi Suvichar

भावांमधील नाते - Good Thoughts In Marathi - Sunder Vichar - सुंदर विचार -relationship -nate - suvichar-vb-vijay bhagat - marathi suvichar - chhan vichar marathi
भावांमधील नाते - Good Thoughts In Marathi - Sunder Vichar - सुंदर विचार -relationship -nate - suvichar-vb-vijay bhagat

नेहमी आई - बाबांना असे वाटतेय की भावाला एक भाऊ पाहिजेच... म्हणूनच खूप घरात दोन किंवा तीन 
भाऊ राहायचे.

लहान असतांना बहिण, भाऊ, सगळ्यांचे एकमेकात जीव असतो, कोणतेही काम एकत्र करणे,खेळणे,
गंमत - जंमत करणे, सोबतच शाळेत जाने... एकमेकांची काळजी घेणे. एकाला काही त्रास झाला तर 
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे... 

कपडेही एकमेकांचे घालणे... काही आवडीची वस्तू, खाण्याचा पदार्थ किंवा काहीही असो जर का तो 
दुसऱ्याला आवडतो तर पहिल्याने कमी घेणें.... आणि आपल्या भावाला जास्त देणे.... आपले मन मारून 
बहिण किंवा भावाच्या गरजांना प्रथम प्राधान्य देणे...!

 आईही नेहमी म्हणायची... काहीही काही झाले तरीही एकमेकांची साथ कधीच सोडायची नाही. 
तेव्हा आईला वचन द्यायचे... आई आम्ही कधीही एकमेकांची  साथ सोडणार नाही... मग आमचे  
कितीही मतभेद झाले तरी.
हे एकूण आई - वडिलांनाही खूप समाधानी वाटायचे. आम्ही भरून पावलो असे आई - वडिलांना  
वाटायचे. एकमेकांसाठी नेहमी त्यागाची भावना रहायची.

अश्या प्रकारे एकदमच मजेत जीवन चालत असतांना मग भावा भावामध्ये काय झाले.
बहिण भावांचे लग्न झालेत आणि संबंधामध्ये तिथूनच दुरावा सुरू झाला.
हे जीवात जीव घालणारे भाऊ आई - वडिलाला जमिनीचे हिस्से मागू लागले.. तसेच हिस्सा पडतांना 
एखाद्या भावाला थोडी जमीन जास्त गेल्यावर तुझी - माझी म्हणून भांडायला लागले...! 
कोर्टकचेर्‍याना सुरुवात झाली.

एकमेकांना एकमेकांचे तोंड बघणे आता अपशकून वाटू लागले...!
घराच्या वाटणीवरून ही भांडणे सुरु झाली... मग आई - वडिलांचा सांभाळ कुणी करायचा... 
आणि जो करेल त्याला जमीन, पैसा जास्त पाहिजे, तसेच बहिणीची हि वाटणी व्हायला लागली.. 
तिला दिवाळीच्या वेळी कोण साडी, चिवडा लाडू देणार.. 
आई एक भावाकडे तर दुसऱ्या भावाकडे वडील असी परिस्थिती दिसायला लागली...

खुपदा समाजात असे हि दिसते कि मुले असूनही आई - वडील मुलीकडे राहतात. 
काही वेळा तर सगळे काही असूनही आई किंवा वडील वृद्धाश्रमात दिसतात.

वाटणीसाठी भाऊ भाऊ एकमेकांची हत्या सूद्धा करतात. आजच्या परिस्थितीत जर का समाजामध्ये 
बघितले तर जवळपास ९०% भाऊ एकत्र दिसत नाही. काही भाऊ एकमेकांशी बोलत नाही, 
काही तर एकमेकांच्या घरी हि जात नाही. काही काही तर एवढे कट्टर असतात की एका भावाचा 
मृत्यू झाला तर दुसरा भाऊ त्याच्या अंतविधिलाही जात नाही. तसेच एकमेकांच्या लग्न कार्यालाही 
जात नाही. 

जर का दुर्दैवाने एखाद्या भावाला आजार झाला किंवा अपघात झाल्यावर दवाखान्यात भर्ती झाल्यावर 
त्याला भेटायला न जाता, ' अजून भोगेल तो ' अशी शब्द वापरतात. 
अरे एकाच आईच्या उदरात जन्म घेवून एवढा शत्रुत्वपणा कूठून आला देव जाणे. 
आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत.

 जो कुणी ही माझी ही पोस्ट [ लेख ] वाचत असेल त्या भावाने  किंवा त्या बहिणीने विचार करावा की 
आपण बहिण भाऊ खरेच एकमेकांशी बोलत नाहीत का. जर का असे असेल तर सगळे विसरून फोन 
करा व क्षमा मागा किंवा भेटायला जा. काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघेही नसणार. 

परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती अडचण येवू न देता 
आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा.

प्रेमाने दादा - ताई  म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी 
म्हणेन.

माणुसकी हाच एक धर्म... मेल्यानंतर खांदा देऊन काय उपयोग...?
जिवंत असतांनाच एकमेकांना हात द्या...

www.vijaybhagat.com


Post a Comment

1 Comments

Please Do Not Enter Any Spam Link In The Comment Box. Thank You